Thursday, December 3, 2020

विचार आणि पडझड - 2 - अनिल कांबळे सरमळकर

विचारविश्व आणि पडझड .. हा लेख अलिकडेच मी  लिहिला होता  इथेच या वॉल वर . सहज आणि थोडा अधिकच आक्रमक आणि सडेतोड लिहिला गेला होता. विशेषता मराठी विचारविश्वाचे वाभाडे काढणारा लेख असेच म्हणावे लागेल. वाचकानी नेहमी प्रमाणेच प्रतिसाद दिला सकारात्मक तर काहिजण दुखावले गेले आहेत. मी समाजमाध्यमामधे लिहिण्यासाठी ओळखला जात नाहीये.. तरीही काही मित्रानी प्रोत्साहन देत मी लिहावे social media वर असे सांगितले. एकमेकांचे कौतुक करुन आपापले व्यावसायिक हितसंबंध टिकवावे असल्या स्वार्थी परंपरेतला मी लेखक पत्रकार नाहीये.. एवढेच काय तर पत्रकारितेमधे आपले विचार स्वातंत्र्य आणि त्याची खोली व दर्जा टिकणार नाही हे लक्षात आल्यावर मी स्वतंत्रपणे मुक्त पत्रकारिता स्वीकारली. मात्र एवढे खरे की पत्रकारितेमधे माझे योगदान फार काही नाहीये.


माझ्या लेखनाने जे लोक दुखावले जातात ते मुख्य धारेतले प्रस्थापित ब्राह्मणी धर्मवादी तर आहेतच परतु तेही आहेत जे स्वतःला पुरोगामी लोकशाहीवादी समाजवादी कम्युनिस्ट आणि आंबेडकरांच्या नावावर गाव पातळीपासून दिल्ली पर्यंत दुकाने घालुन बसले आहेत ते लोक .वयक्तिक जरी मला या psudo खोटारड्या आंबेडकरवादी लोकांचा काहीही त्रास नसला तरी त्यामुळेच समाजाचे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे नुकसान होत आले आहे व होत आहे.  वैचारीक बाबतीत सगळेच काही  थोर आणि स्वच्छ मिळेल असे नाहीये हे मान्य पण सगळेच काही हिणकस खालच्या पातळीला आले की विद्रोह गरजेचा असतो. सर्व सामान्य लोकाना काहीच देणे घेणे नसते की कोणती विचारसरणी आणि कोणती प्रति विचारसरणी सत्तेवर आहे किवा सत्तेबाहेर आहे आणि कोण लोक असे आहेत जे कोणतीही विचारसरणी सत्तेवर असली तरी त्याचे फायदे उकळीत असतात . सामान्य लोकाना आपले जिवन जगणेच फार मुश्कील झालेले असते नेहमीच , कुणाचीही सत्ता असली तरी.


स्वतःला पुरोगामी म्हणवणारे हे लोक का दुखावतात 

एरवी हे लोक स्वतःला व्यापक बुद्धीवादी Broad minded समजतात आणि केव्हा  त्यांच्यावर टीका झाली की ते Hurt होतात ? मग हे Double standerd नाहीये का ? आहेच ! कारण एका बाजूला हे लोक स्वतःला सुसंवादाचे समर्थक ( ? ) ( हाच तो भयंकर शब्द पुन्हा येत राहतो ) समजतात.. जसे सनातनी लोक त्यांच्यावर टिका झाली की ते थेट टीका करणाऱ्याला 

' धर्मविरोधी' किवा "देशद्रोही " ठरवतात... आणि पुरोगामी त्यांच्यावर टीका करणार्याला धर्मवादी नाहीच तर मग तो मनुष्य RSS वालाच असला पाहिजे असला महाभयंकर शोध लावतात. Idiology च stagnation जेव्हा होत तेव्हा सर्वस्पर्षी समीक्षा आणि सुसंवादी परंपरा follow करावी लागते अशी वेगळी तिसरी किवा त्याहूनही वेगळी चौथी परंपरा निर्माण करावी लागते. 

आजच्या so called smart पिढीला फ्क्त speed आणि skilled education माहिती आहे संपूर्ण पिढी विचार ,आदर्श , मानदंड, स्वतःची खरी देशी किवा विद्रोही परंपरा काय आहे आपला धर्म काय सांग्तोय ..

त्यात कोणत्या गोस्टी अस्विकार्ह आहेत कोणत्या गोस्टी कालातीत आणि थोर आहेत हे त्याना सांगितले जात नाहीत तेव्हाच ही पिढी मग धर्मवाद्यांच्या हाती सापडते . आणि धर्माच्या बेहोषीत मग महाभयानक समाजघातक झुंडीच्या झुंडी तयार होतात... आपला देश आधी पारतंत्र्याच्या दिर्घ काळोखातून आलाय आणि आता एकतर्फी उदात्त पण अपयशी पुरोगामीत्वाच्या दिर्घमहाकथनातुन बाहेर पडताच धर्मवादाच्या त्याहूनही भयंकर काळोख्या गुहेतून निघालाय ... Dividers ची कधीही बरी न होणारी जखम मस्तकावर घेउन भळाभळती जखम !! अश्वथामा सारखी जणु ....

  

जुनाट परंपरांचे किवा विचारांचे पुन्हा पुनरुज्जीवन का केले जात आहे ? सर्वच विचारसरण्या आणि धर्माकडून ?

सांस्कृतिक मर्यादा ?  या सांस्कृतीक मर्यादेची मी नेहमीच चर्चा करत आलो आहे.. का आणि कुठून आली आहे ती जगातील सर्व  समाजामध्ये ?  


दोन महायुद्धात युरोपने अनुभवले की माणसाचे हादरवून टाकणारे रुप आणि सत्य.. युरोपही मग मानसिक सुरक्षीततेच्या शोधात निघाला दरम्यान औद्योगिक क्रांती पुर्णत्वास जाणार होती.. जखमा भरु लागल्या होत्या भारतासह  अनेक राष्ट्र वसाहतीतून मुक्त होत होती.. स्वातंत्र्याचे वारे जगभर वाहू लागले होते. अनेक देशाबरोबर देशान्तर्गत गुलाम शोषित दलित आदिवासी आंदोलने उभी राहीली होती.. दबलेले समाज मुक्त होत होते. मात्र विद्न्यान तंत्रज्ञान अत्यंत आक्रमक गतीने सरसावत होते ..

आणि आता मुक्त झालेले देश युरोपीय जे आधीच विस्तारवादी  सांब्राज्यवादी होते त्यांची भुक पुन्हां उफाळून आली आणि शीतयुद्धाचे युग सुरु झाले ... या सततच्या युद्धात एकमेकांच्या विरोधी एकमेकांचे बळ जसे वापरले गेले तसेच एकमेकांचे धर्म वापरले गेले.. डावपेच म्ह्णून तयार केलेल्या अत्यंत अमानवी व क्रूर धर्मप्रेरित दहशतवादी संघटना जन्मल्या .. त्यातूनच जग स्वतःची सुरक्षितता आणि अस्मिता म्हणून समाज आपल्या पुरातन सनातन आणि सनातनी धर्माकडे वळले ...जग विद्न्यान तंत्रज्ञाना कडे न वळता धर्माकडे वळले ... तोही धर्म नव्हे जो उद्दातता सांस्कृतीक ताकद देतो त्या धर्माकडे नव्हे तर तो धर्म जो बेहोषी देतो धर्मवेड शिकवतो दुसऱ्या धर्म,  जातीला शत्रू ठरवतो तो धर्म ....

हेच ते Calsh of Civilisation ..... 


तंत्रज्ञान आणि विद्न्यानही एक productive ताकद म्ह्णून वापरले गेले या अशा सांस्कृतीक जागतिक सत्तेच्या संघर्षात. आजही सर्व धर्मातील  पाखंडी सनातनी पुराणमतवादी विद्न्यान आणि तंत्रज्ञानाला आपले शत्रू समजतात. आणि हे फ्क्त भारतात नव्हे तर प्रगत  आधुनिक उत्तर आधुनिक युरोप अमेरिकेतून केव्हापासून सुरु झाले आहे ... हीच ती  सांस्कृतिक मर्यादा नाहीये का ?


धर्म उद्दात आदर्श आणि संस्कार देतात, ती मानवी समाजाची गरज आहे हे अबाधित सत्य आहे आणि ते मान्यही करावे लागेल. मात्र मानवी समाजातील विषमता आणि त्यातून निर्माण होणारा अन्याय अत्याचार आणि विकृती याबद्दल धर्म काय सांगतात ? ... जे नियतीने भोग दिले ते भोगायचे.. धर्म धर्मसंस्थापक किवा देवाला  याबद्दल प्रश्न विचारायचे नाही... परंतू मानवी स्वातंत्र्य हे उत्तुंग आणि कशाहूनही महान आणि नित्य आहे .. या जाणीवेतूनच जगभर मानवी स्वातंत्र्य चे लढे लढले गेले आणि जिंकले गेले आजही लढले जात आहेत जिंकले जात आहेत ... यापुढेही लढले जातील जिंकले जातील ... जागतिक सांस्कृतिक मर्यादेच्या  महाधोकादायक आजच्या वळणावर एकच दिलासादायक गोस्ट आहे ती म्हणजे मानवी स्वातंत्र्य आणि तीची लढाई आजही सुरु आहे,  जागृत आहे. 


आपल्याकडचे धर्मवादी गरज पडेल तेव्हा विद्न्यानवादी व पुरोगामी झगा घालतात आणि आपल्याकडचे पुरोगामी विद्न्यान तंत्रज्ञान लोकशाहीवादी समाजवादी गरज पडेल तर धार्मिक होतात... देशच आपला विविधतेने " नटलेला.. मग आपल्या या तथाकथित सामाजिक राजकीय धार्मिक विचारवंतांना  नेत्यांना तसे " नटायला " 

नको ? ...  शेवटी हे सगळे " नट '  च आहेत.


वैचारीक बाबतीत जंग जंग पशाडल्यानंतरही आपल्या बाप लेखकाना मग आपली सांस्कृतिक' धरोवर ' मग अडगळ असली  तरी ती " समृध्द ' वाटू लागले.. मग लेखक बहुजन वर्गाचा राहत नाही तो मग देशाची अस्मिता बनतो मग शेवटी त्या दणकट देशी लेखकाला 

' न्यानपिठ ' दिले जाते. आणि म्ग अशा भारी लेखकाचे समर्थक हळूहळू साहित्य अकादमीच्या वाटेवर येउ लागतात .. पण आम्हाला उगाचच मग वाटत राहत  होत की कुणीतरी सामान्य बहुजन वर्गात डेस्टोवस्कीच्या तोडीचा लेखक आहे पण ते आमच स्वप्नच राहत की काय कोण जाणे ?  


अस म्हट्ल जात की जगातले सर्व ख्रिश्चन लेखक वेगळे काहीही लिहित नाही ते पुन्हा पुन्हा ' बायबल " च लिहित असतात .. तसच आम्ही सर्व भारतीय लेखक पुन्हा पुन्हा " महाभारत ' च लिहित असतो .... 


नव काही सांगता येत नाही. पुर्णता नवीन मांडणी विद्न्यान आणि तंत्रज्ञान करत असते. मात्र त्यालाही पूर्वसूरींनी केलेले काम संशोधन बघावे लागते. न्यान आणि विचार आभाळातून पडत नाहीत त्यामागे पुर्वभान पुर्व चिंतन असते. त्याची पार्श्वभूमी तयार व्हावी लागते. 

भारतीय विचारात तर चिंतन वेद कालापासून सुरु आहे.

वेद आणि उपनिषदे अर्थातच great आहेत पण केवळ वैदिक परंपरेला विरोधाला विरोध म्हणून पुरोगामी विचारविश्वाने त्याकडे दुर्लक्ष केले.. काळानुसार त्यात काही गोस्टी कालबाह्य आहेतच .. तसे सर्वच न्यान परंपरात असतात. मात्र वेद उपनिषदा मधली कल्पकता सर्जनशीलता भव्यता खरोखरच भव्य  आहे. आणि वैदिकांनी जो अवैदिक विशेषता बुद्धविचाराकडे बघण्याचा जो पूर्वग्रह दूषित दृष्टीकोण दाखवलाय त्यामुळेच अथांग अमर्यादित बुद्ध त्याना आपलासा करताच आला नाहीये... मात्र चोरी चुपके मात्र बुद्ध विचार त्यानी घेतले आहेत ते आपल्या सांस्कृतिक इतिहासात जागोजागी दिसत राहतात. 


लोकशाहीच्या बुरख्याआड देश स्वतंत्र झाल्यापासूनच लोकशाहीचे पाशवीकरण सुरु झाले आहे आणि आज तर त्याने कळस गाठला आहे. अशा आव्हानात्मक काळात त्याचे केवळ विश्लेषण पुरेसे नसून लोकशाही हे जगातील सामान्य माणसांचे जगण्याचे शेवटचे आशास्थान आहे तेही धोक्यात आले आहे. जगभर मोठ मोठ्या विद्यापीठामधून विचारवंत विचार मांडत आहेत त्याची कमी अवकाशात का असेना चर्चा होत आहे. ही चर्चा कृतीचे कारण ठरणे गरजेचे आहे. 


प्रस्थापित उजवी किवा वर्चस्ववादी विचारधारा तसेच त्याला थेट विरोधी साम्यवादी समाजवादी विचारधारा

आणि तिसरी लिबरल उदारमतवादी विचारधारा आणि त्यापलिकडे कित्तेक विचारसरण्या... 

प्रत्येक विचारसरणीमधे अंतर्विरोध आहेत. कुठूनही त्या विचारसरण्या एकाच समान टोकावर येतात आणि विरोधीही मार्ग घेतात. मात्र राजकीय सत्ता या सर्वानाच हवी आहे. या प्रत्येक विचारातुन लिहिले गेलेले साहित्य काव्य कला त्या विचारधारेचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठीच लिहिले जाते कळत नकळत. अर्थात विचार साहित्य कला हे सत्तेच्या दिशेनेच जाते.. सत्ता कोणतीही राजकीय किवा सांस्कृतीक.  म्हणूनच कदाचित जॅक डेरिदा यानी म्हणाले आहेत ' Every text has its politics ' 


सर्व धर्म , शास्त्रे, महाकाव्ये, काव्ये,  नाट्य कला, आयडियॉलॉजी सत्तेच्या दिशेने चालली आहेत तर ? 

अर्थातच दुर्दैवाने उत्तर " होय ' असे आहे.

त्यासाठीच ती सर्व आक्रमक आणि बेहोष झाली आहेत 

आणि शेवटी सगळी एकत्र येतात धर्माच्या समुद्रात..

आणि तो समुद्र मग ' दहशतवादी '  होतो.


कोण म्हणत काव्य महाकाव्य साहित्य थोर असते ? 

त्याच सूक्ष्म वाचन केल की लक्षात येत त्या त्या लेखनात आपापल्या वंश धर्म जात याचे हितसंबंध शुपे लपलेले आहेत.  आणि शोषितांच्या लेखनात वर्चस्ववाद्यांचे सांस्कृतिक व्यूह आणि  हितसंबध स्पष्ट उघड होतात . अर्थात साहित्य आणि साहित्यिक थोर असण्यापेक्षा सांस्कृतीक हितसंघर्ष हितसंबंधच लिहित असतो. 


मात्र संतुलित मानवी समाज निर्माण व्हावा हे स्वप्न निसंशय थोर आहे.  मात्र संपूर्ण विचारविश्वच आज असहिष्णु झालेले आहे. सामान्य माणसाल हवे असलेले सुखी समाधानी आणि समान समाजव्यवस्थेचे जग आता अधिकाधिक कठीण होत चालले आहे. हे सर्व घडत असताना भांडवलशाही आणि तंत्रज्ञान हातात हात घालुन औद्योगिक जग सुसाट घेवुन चालले आहे .. या दोघानाही धर्म या गोस्टीशी फारसे देणे घेणे नाही आणि कला साहित्य हे त्यांच्यासाठी फ्क्त एक product असते.


अत्यंत धोकादायक वळण आहे हे .. जगातील साधे सामान्य लोक ते ख्रिश्चन असतील मुस्लिम किवा हिंदु असतील .. तिघानाही स्वताला तारण्यासाठी " अवताराची "  वाट पहायचाच तेवढा पर्याय त्यांच्या धर्मविचारात आहे ... 


आणि सर्व प्रकाचे Leftist ? ते काय करतील आता.. ते तर स्वतःलाच शोषितांचे तारणहार समजत होते.. ते अवतार मानत नाहीत. बदलत्या समकालात ते कोणता breakthrough चा विचार करत आहेत. नव - साम्यवादाची  मांडणी करतील का ते ? करावी लागेल त्याना.  open marxism मधे गुंतुन ते पुन्हा orthodox marxism कडे गेलेत तर  ? आधी उभ राहण्यासाठी जी लोकशाहीची भूमी आहे तीच भेगाळत चालली आहे. संपूर्ण जगात सत्तेच्या जोरावर न्याययंत्रणानाही वाकवले जात आहे जो की जनांचा आणि लोकशाहीचा शेवटचा दिलासा असतो त्याचेच पाशवीकरण केले जात आहे .. धोका हाच आहे की संपूर्ण जगाचे एक mega state होइल आणि लोकशाहीच्या बुरख्याआड एकाच वेळी एक अदृष्य जागतिक  हुकुमशाही जन्म घेइल ... हे घडणारच नाही हे सांगणे अशक्य.


साम्यवाद समाजवाद आणि लोकशाहीवादी विचार विश्वाला जर हे जग वाचवायचे असेल आणि ते हेच आपले युगकार्य समजत असतील तर त्याना या आजच्या स्वतासहीत इतरांना आलेल्या " सांस्कृतिक मर्यादे" ला तोडावे लागेल.


... Dr.Anil Saramalkar.

3/12/2020.

©

.........

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.