Tuesday, December 22, 2020

जिल्हास्तरीय युवा महोत्सवासाठी स्पर्धकांनी प्रवेशिकांसाठी आवाहन

जिल्हास्तरीय युवा महोत्सवासाठी स्पर्धकांनी प्रवेशिका सादर कराव्यात जिल्हा  क्रीडा अधिकारी विजय शिंदे                                                  

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दि. 25 डिसेंबर 2020 रोजी सकाळी 11.00 वा. ऑनलाईन/व्हर्चुअल पद्धतीने आयोजित करण्यात येत आहे. यासाठी स्पर्धकांनी प्रवेशिका सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांनी केले आहे.

जिल्हास्तरीय युवा महोत्सवात पुढीलप्रमाणे स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

अ.क्र.

स्पर्धेचे नाव

सहभागी युवा संख्या

वेळ

अ.क्र.

स्पर्धेचे नाव

सहभागी युवा संख्या

वेळ

वैयक्तीक बाबी

एकांकिका-इंग्रजी/हिंदी

१२

४५ मि

हार्मोनियम (लाईट)

०१

१० मि

शास्त्रीय गायन(हिंदुस्तानी)

०१

१५ मि

१०

गिटार

०१

१० मि

शास्त्रीय गायन(कर्नाटकी)

०१

१५ मि

११

मणिपूरी नृत्य

०१

१५ मि

सितार

०१

१५ मि

१२

ओडिसी नृत्य

०१

१५ मि

बासरी

०१

१५ मि

१३

भरतनाट्यम नृत्य

०१

१५ मि

तबला

०१

१० मि

१४

कथ्थक नृत्य

०१

१५ मि

वीणा

०१

१५ मि

१५

कुचिपुडी नृत्य

०१

१५ मि

मृदंग

०१

१० मि

१६

वक्तृत्व-(इंग्रजी / हिंदी)

      हद्दपार

सांघिक बाबी

लोकनृत्य

२०

१५ मि

लोकगीत

१०

०७ मि

स्पर्धेचे नियम पुढील प्रमाणे आहेत १)  सहभागी युवा १५ ते २९ वयोगटातील असावा.(युवा वयोगटाची व्याख्या केंद्र शासनाने वेळोवेळी निश्चित केलेल्य निकषाप्रमाणे राहील.) ०१.०१.१९९२ ते ०१.०१.२००६ यामधील जन्मतारीख असावी. २) ज्या बाबीना साथ संगत आवश्यक आहे.त्या कलाकारांना वयोमर्यादा लागू नाही.३) एकांकिकेमध्ये सहभागी होणारे सर्व युवा कलाकार तसेच एकांकिका लेखक, निर्माता, दिग्दर्शक सुद्धा १५ ते २९ वयोगटातील असावेत.४) सहभागी होणारा युवा हा महाराष्ट्रातील,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहीवासी असावा.५) कथ्थक, कुचिपुडी, मणिपूरी, ओडीसी, भरतनाट्यम नृत्य सादर करणा-या कलाकारांना पूर्वमुद्रीत ध्वनीफितीवर (कॅसेट,सीडी ) कार्यक्रम सादर करता येईल.६) लोकगीत, लोकनृत्य या प्रकारातील गीते चित्रपट बाह्य असणे आवश्यक आहे. कॅसेट, रेकार्ड डान्स मान्य केला जाणार नाही.७) अस्पर्धात्मक बाबीच्या निवडीचे अधिकार मा.आयुक्त,क्रीडा व युवक सेवा, पुणे यांना राहतील.८) युवा महोत्सवाच्या दरम्यान येणा-या तक्रारीचे निवारण करण्याकरीता राज्य, विभाग व जिल्हा स्तरावर त्रिसदस्यीय तक्रार समिती नियुक्त करण्यात येईल आणि समितीचा निर्णय अंतिम राहील. पात्र उमेदवाराला त्याच्या संपर्क क्र. वर स्पर्धेची लिंक पाठविण्यात येईल. त्या लिंक च्या सहाय्याने स्पर्धेकाने स्पर्धा दिनांकाला उपस्थित रहावे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १५ ते २९ वयोगटातील युवक युवतींनी उपरोक्त युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी दि.२5 डिसेंबर,२०२० सायं.०५.०० वाजेपर्यत आपली प्रवेशिका विहित नमुन्यात,वयाच्या व रहिवाशी दाखल्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुख्य प्रशासकीय इमारत तळमजला ए,ब्लॉक सिंधुदुर्गनगरी येथे कार्यालयीन वेळेत अथवा ई-मेल.sindhusports@yahoo.com, वर विहित वेळेत पाठवावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी  श्री. विजय शिंदे यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.