Showing posts with label संपादकीय. Show all posts
Showing posts with label संपादकीय. Show all posts

Thursday, December 3, 2020

विचार आणि पडझड - 2 - अनिल कांबळे सरमळकर

विचारविश्व आणि पडझड .. हा लेख अलिकडेच मी  लिहिला होता  इथेच या वॉल वर . सहज आणि थोडा अधिकच आक्रमक आणि सडेतोड लिहिला गेला होता. विशेषता मराठी विचारविश्वाचे वाभाडे काढणारा लेख असेच म्हणावे लागेल. वाचकानी नेहमी प्रमाणेच प्रतिसाद दिला सकारात्मक तर काहिजण दुखावले गेले आहेत. मी समाजमाध्यमामधे लिहिण्यासाठी ओळखला जात नाहीये.. तरीही काही मित्रानी प्रोत्साहन देत मी लिहावे social media वर असे सांगितले. एकमेकांचे कौतुक करुन आपापले व्यावसायिक हितसंबंध टिकवावे असल्या स्वार्थी परंपरेतला मी लेखक पत्रकार नाहीये.. एवढेच काय तर पत्रकारितेमधे आपले विचार स्वातंत्र्य आणि त्याची खोली व दर्जा टिकणार नाही हे लक्षात आल्यावर मी स्वतंत्रपणे मुक्त पत्रकारिता स्वीकारली. मात्र एवढे खरे की पत्रकारितेमधे माझे योगदान फार काही नाहीये.


माझ्या लेखनाने जे लोक दुखावले जातात ते मुख्य धारेतले प्रस्थापित ब्राह्मणी धर्मवादी तर आहेतच परतु तेही आहेत जे स्वतःला पुरोगामी लोकशाहीवादी समाजवादी कम्युनिस्ट आणि आंबेडकरांच्या नावावर गाव पातळीपासून दिल्ली पर्यंत दुकाने घालुन बसले आहेत ते लोक .वयक्तिक जरी मला या psudo खोटारड्या आंबेडकरवादी लोकांचा काहीही त्रास नसला तरी त्यामुळेच समाजाचे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे नुकसान होत आले आहे व होत आहे.  वैचारीक बाबतीत सगळेच काही  थोर आणि स्वच्छ मिळेल असे नाहीये हे मान्य पण सगळेच काही हिणकस खालच्या पातळीला आले की विद्रोह गरजेचा असतो. सर्व सामान्य लोकाना काहीच देणे घेणे नसते की कोणती विचारसरणी आणि कोणती प्रति विचारसरणी सत्तेवर आहे किवा सत्तेबाहेर आहे आणि कोण लोक असे आहेत जे कोणतीही विचारसरणी सत्तेवर असली तरी त्याचे फायदे उकळीत असतात . सामान्य लोकाना आपले जिवन जगणेच फार मुश्कील झालेले असते नेहमीच , कुणाचीही सत्ता असली तरी.


स्वतःला पुरोगामी म्हणवणारे हे लोक का दुखावतात 

एरवी हे लोक स्वतःला व्यापक बुद्धीवादी Broad minded समजतात आणि केव्हा  त्यांच्यावर टीका झाली की ते Hurt होतात ? मग हे Double standerd नाहीये का ? आहेच ! कारण एका बाजूला हे लोक स्वतःला सुसंवादाचे समर्थक ( ? ) ( हाच तो भयंकर शब्द पुन्हा येत राहतो ) समजतात.. जसे सनातनी लोक त्यांच्यावर टिका झाली की ते थेट टीका करणाऱ्याला 

' धर्मविरोधी' किवा "देशद्रोही " ठरवतात... आणि पुरोगामी त्यांच्यावर टीका करणार्याला धर्मवादी नाहीच तर मग तो मनुष्य RSS वालाच असला पाहिजे असला महाभयंकर शोध लावतात. Idiology च stagnation जेव्हा होत तेव्हा सर्वस्पर्षी समीक्षा आणि सुसंवादी परंपरा follow करावी लागते अशी वेगळी तिसरी किवा त्याहूनही वेगळी चौथी परंपरा निर्माण करावी लागते. 

आजच्या so called smart पिढीला फ्क्त speed आणि skilled education माहिती आहे संपूर्ण पिढी विचार ,आदर्श , मानदंड, स्वतःची खरी देशी किवा विद्रोही परंपरा काय आहे आपला धर्म काय सांग्तोय ..

त्यात कोणत्या गोस्टी अस्विकार्ह आहेत कोणत्या गोस्टी कालातीत आणि थोर आहेत हे त्याना सांगितले जात नाहीत तेव्हाच ही पिढी मग धर्मवाद्यांच्या हाती सापडते . आणि धर्माच्या बेहोषीत मग महाभयानक समाजघातक झुंडीच्या झुंडी तयार होतात... आपला देश आधी पारतंत्र्याच्या दिर्घ काळोखातून आलाय आणि आता एकतर्फी उदात्त पण अपयशी पुरोगामीत्वाच्या दिर्घमहाकथनातुन बाहेर पडताच धर्मवादाच्या त्याहूनही भयंकर काळोख्या गुहेतून निघालाय ... Dividers ची कधीही बरी न होणारी जखम मस्तकावर घेउन भळाभळती जखम !! अश्वथामा सारखी जणु ....

  

जुनाट परंपरांचे किवा विचारांचे पुन्हा पुनरुज्जीवन का केले जात आहे ? सर्वच विचारसरण्या आणि धर्माकडून ?

सांस्कृतिक मर्यादा ?  या सांस्कृतीक मर्यादेची मी नेहमीच चर्चा करत आलो आहे.. का आणि कुठून आली आहे ती जगातील सर्व  समाजामध्ये ?  


दोन महायुद्धात युरोपने अनुभवले की माणसाचे हादरवून टाकणारे रुप आणि सत्य.. युरोपही मग मानसिक सुरक्षीततेच्या शोधात निघाला दरम्यान औद्योगिक क्रांती पुर्णत्वास जाणार होती.. जखमा भरु लागल्या होत्या भारतासह  अनेक राष्ट्र वसाहतीतून मुक्त होत होती.. स्वातंत्र्याचे वारे जगभर वाहू लागले होते. अनेक देशाबरोबर देशान्तर्गत गुलाम शोषित दलित आदिवासी आंदोलने उभी राहीली होती.. दबलेले समाज मुक्त होत होते. मात्र विद्न्यान तंत्रज्ञान अत्यंत आक्रमक गतीने सरसावत होते ..

आणि आता मुक्त झालेले देश युरोपीय जे आधीच विस्तारवादी  सांब्राज्यवादी होते त्यांची भुक पुन्हां उफाळून आली आणि शीतयुद्धाचे युग सुरु झाले ... या सततच्या युद्धात एकमेकांच्या विरोधी एकमेकांचे बळ जसे वापरले गेले तसेच एकमेकांचे धर्म वापरले गेले.. डावपेच म्ह्णून तयार केलेल्या अत्यंत अमानवी व क्रूर धर्मप्रेरित दहशतवादी संघटना जन्मल्या .. त्यातूनच जग स्वतःची सुरक्षितता आणि अस्मिता म्हणून समाज आपल्या पुरातन सनातन आणि सनातनी धर्माकडे वळले ...जग विद्न्यान तंत्रज्ञाना कडे न वळता धर्माकडे वळले ... तोही धर्म नव्हे जो उद्दातता सांस्कृतीक ताकद देतो त्या धर्माकडे नव्हे तर तो धर्म जो बेहोषी देतो धर्मवेड शिकवतो दुसऱ्या धर्म,  जातीला शत्रू ठरवतो तो धर्म ....

हेच ते Calsh of Civilisation ..... 


तंत्रज्ञान आणि विद्न्यानही एक productive ताकद म्ह्णून वापरले गेले या अशा सांस्कृतीक जागतिक सत्तेच्या संघर्षात. आजही सर्व धर्मातील  पाखंडी सनातनी पुराणमतवादी विद्न्यान आणि तंत्रज्ञानाला आपले शत्रू समजतात. आणि हे फ्क्त भारतात नव्हे तर प्रगत  आधुनिक उत्तर आधुनिक युरोप अमेरिकेतून केव्हापासून सुरु झाले आहे ... हीच ती  सांस्कृतिक मर्यादा नाहीये का ?


धर्म उद्दात आदर्श आणि संस्कार देतात, ती मानवी समाजाची गरज आहे हे अबाधित सत्य आहे आणि ते मान्यही करावे लागेल. मात्र मानवी समाजातील विषमता आणि त्यातून निर्माण होणारा अन्याय अत्याचार आणि विकृती याबद्दल धर्म काय सांगतात ? ... जे नियतीने भोग दिले ते भोगायचे.. धर्म धर्मसंस्थापक किवा देवाला  याबद्दल प्रश्न विचारायचे नाही... परंतू मानवी स्वातंत्र्य हे उत्तुंग आणि कशाहूनही महान आणि नित्य आहे .. या जाणीवेतूनच जगभर मानवी स्वातंत्र्य चे लढे लढले गेले आणि जिंकले गेले आजही लढले जात आहेत जिंकले जात आहेत ... यापुढेही लढले जातील जिंकले जातील ... जागतिक सांस्कृतिक मर्यादेच्या  महाधोकादायक आजच्या वळणावर एकच दिलासादायक गोस्ट आहे ती म्हणजे मानवी स्वातंत्र्य आणि तीची लढाई आजही सुरु आहे,  जागृत आहे. 


आपल्याकडचे धर्मवादी गरज पडेल तेव्हा विद्न्यानवादी व पुरोगामी झगा घालतात आणि आपल्याकडचे पुरोगामी विद्न्यान तंत्रज्ञान लोकशाहीवादी समाजवादी गरज पडेल तर धार्मिक होतात... देशच आपला विविधतेने " नटलेला.. मग आपल्या या तथाकथित सामाजिक राजकीय धार्मिक विचारवंतांना  नेत्यांना तसे " नटायला " 

नको ? ...  शेवटी हे सगळे " नट '  च आहेत.


वैचारीक बाबतीत जंग जंग पशाडल्यानंतरही आपल्या बाप लेखकाना मग आपली सांस्कृतिक' धरोवर ' मग अडगळ असली  तरी ती " समृध्द ' वाटू लागले.. मग लेखक बहुजन वर्गाचा राहत नाही तो मग देशाची अस्मिता बनतो मग शेवटी त्या दणकट देशी लेखकाला 

' न्यानपिठ ' दिले जाते. आणि म्ग अशा भारी लेखकाचे समर्थक हळूहळू साहित्य अकादमीच्या वाटेवर येउ लागतात .. पण आम्हाला उगाचच मग वाटत राहत  होत की कुणीतरी सामान्य बहुजन वर्गात डेस्टोवस्कीच्या तोडीचा लेखक आहे पण ते आमच स्वप्नच राहत की काय कोण जाणे ?  


अस म्हट्ल जात की जगातले सर्व ख्रिश्चन लेखक वेगळे काहीही लिहित नाही ते पुन्हा पुन्हा ' बायबल " च लिहित असतात .. तसच आम्ही सर्व भारतीय लेखक पुन्हा पुन्हा " महाभारत ' च लिहित असतो .... 


नव काही सांगता येत नाही. पुर्णता नवीन मांडणी विद्न्यान आणि तंत्रज्ञान करत असते. मात्र त्यालाही पूर्वसूरींनी केलेले काम संशोधन बघावे लागते. न्यान आणि विचार आभाळातून पडत नाहीत त्यामागे पुर्वभान पुर्व चिंतन असते. त्याची पार्श्वभूमी तयार व्हावी लागते. 

भारतीय विचारात तर चिंतन वेद कालापासून सुरु आहे.

वेद आणि उपनिषदे अर्थातच great आहेत पण केवळ वैदिक परंपरेला विरोधाला विरोध म्हणून पुरोगामी विचारविश्वाने त्याकडे दुर्लक्ष केले.. काळानुसार त्यात काही गोस्टी कालबाह्य आहेतच .. तसे सर्वच न्यान परंपरात असतात. मात्र वेद उपनिषदा मधली कल्पकता सर्जनशीलता भव्यता खरोखरच भव्य  आहे. आणि वैदिकांनी जो अवैदिक विशेषता बुद्धविचाराकडे बघण्याचा जो पूर्वग्रह दूषित दृष्टीकोण दाखवलाय त्यामुळेच अथांग अमर्यादित बुद्ध त्याना आपलासा करताच आला नाहीये... मात्र चोरी चुपके मात्र बुद्ध विचार त्यानी घेतले आहेत ते आपल्या सांस्कृतिक इतिहासात जागोजागी दिसत राहतात. 


लोकशाहीच्या बुरख्याआड देश स्वतंत्र झाल्यापासूनच लोकशाहीचे पाशवीकरण सुरु झाले आहे आणि आज तर त्याने कळस गाठला आहे. अशा आव्हानात्मक काळात त्याचे केवळ विश्लेषण पुरेसे नसून लोकशाही हे जगातील सामान्य माणसांचे जगण्याचे शेवटचे आशास्थान आहे तेही धोक्यात आले आहे. जगभर मोठ मोठ्या विद्यापीठामधून विचारवंत विचार मांडत आहेत त्याची कमी अवकाशात का असेना चर्चा होत आहे. ही चर्चा कृतीचे कारण ठरणे गरजेचे आहे. 


प्रस्थापित उजवी किवा वर्चस्ववादी विचारधारा तसेच त्याला थेट विरोधी साम्यवादी समाजवादी विचारधारा

आणि तिसरी लिबरल उदारमतवादी विचारधारा आणि त्यापलिकडे कित्तेक विचारसरण्या... 

प्रत्येक विचारसरणीमधे अंतर्विरोध आहेत. कुठूनही त्या विचारसरण्या एकाच समान टोकावर येतात आणि विरोधीही मार्ग घेतात. मात्र राजकीय सत्ता या सर्वानाच हवी आहे. या प्रत्येक विचारातुन लिहिले गेलेले साहित्य काव्य कला त्या विचारधारेचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठीच लिहिले जाते कळत नकळत. अर्थात विचार साहित्य कला हे सत्तेच्या दिशेनेच जाते.. सत्ता कोणतीही राजकीय किवा सांस्कृतीक.  म्हणूनच कदाचित जॅक डेरिदा यानी म्हणाले आहेत ' Every text has its politics ' 


सर्व धर्म , शास्त्रे, महाकाव्ये, काव्ये,  नाट्य कला, आयडियॉलॉजी सत्तेच्या दिशेने चालली आहेत तर ? 

अर्थातच दुर्दैवाने उत्तर " होय ' असे आहे.

त्यासाठीच ती सर्व आक्रमक आणि बेहोष झाली आहेत 

आणि शेवटी सगळी एकत्र येतात धर्माच्या समुद्रात..

आणि तो समुद्र मग ' दहशतवादी '  होतो.


कोण म्हणत काव्य महाकाव्य साहित्य थोर असते ? 

त्याच सूक्ष्म वाचन केल की लक्षात येत त्या त्या लेखनात आपापल्या वंश धर्म जात याचे हितसंबंध शुपे लपलेले आहेत.  आणि शोषितांच्या लेखनात वर्चस्ववाद्यांचे सांस्कृतिक व्यूह आणि  हितसंबध स्पष्ट उघड होतात . अर्थात साहित्य आणि साहित्यिक थोर असण्यापेक्षा सांस्कृतीक हितसंघर्ष हितसंबंधच लिहित असतो. 


मात्र संतुलित मानवी समाज निर्माण व्हावा हे स्वप्न निसंशय थोर आहे.  मात्र संपूर्ण विचारविश्वच आज असहिष्णु झालेले आहे. सामान्य माणसाल हवे असलेले सुखी समाधानी आणि समान समाजव्यवस्थेचे जग आता अधिकाधिक कठीण होत चालले आहे. हे सर्व घडत असताना भांडवलशाही आणि तंत्रज्ञान हातात हात घालुन औद्योगिक जग सुसाट घेवुन चालले आहे .. या दोघानाही धर्म या गोस्टीशी फारसे देणे घेणे नाही आणि कला साहित्य हे त्यांच्यासाठी फ्क्त एक product असते.


अत्यंत धोकादायक वळण आहे हे .. जगातील साधे सामान्य लोक ते ख्रिश्चन असतील मुस्लिम किवा हिंदु असतील .. तिघानाही स्वताला तारण्यासाठी " अवताराची "  वाट पहायचाच तेवढा पर्याय त्यांच्या धर्मविचारात आहे ... 


आणि सर्व प्रकाचे Leftist ? ते काय करतील आता.. ते तर स्वतःलाच शोषितांचे तारणहार समजत होते.. ते अवतार मानत नाहीत. बदलत्या समकालात ते कोणता breakthrough चा विचार करत आहेत. नव - साम्यवादाची  मांडणी करतील का ते ? करावी लागेल त्याना.  open marxism मधे गुंतुन ते पुन्हा orthodox marxism कडे गेलेत तर  ? आधी उभ राहण्यासाठी जी लोकशाहीची भूमी आहे तीच भेगाळत चालली आहे. संपूर्ण जगात सत्तेच्या जोरावर न्याययंत्रणानाही वाकवले जात आहे जो की जनांचा आणि लोकशाहीचा शेवटचा दिलासा असतो त्याचेच पाशवीकरण केले जात आहे .. धोका हाच आहे की संपूर्ण जगाचे एक mega state होइल आणि लोकशाहीच्या बुरख्याआड एकाच वेळी एक अदृष्य जागतिक  हुकुमशाही जन्म घेइल ... हे घडणारच नाही हे सांगणे अशक्य.


साम्यवाद समाजवाद आणि लोकशाहीवादी विचार विश्वाला जर हे जग वाचवायचे असेल आणि ते हेच आपले युगकार्य समजत असतील तर त्याना या आजच्या स्वतासहीत इतरांना आलेल्या " सांस्कृतिक मर्यादे" ला तोडावे लागेल.


... Dr.Anil Saramalkar.

3/12/2020.

©

.........

Monday, November 23, 2020

विचारविश्व आणि पडझड - अनिल सरमळकर

अत्यंत सवंगतेचा हा काळ आहे विचार आणि तत्वज्ञानाची चर्चा ही मुळातच कधीही व्यापकपणे समाजात तेव्हाही होत नव्हती आणि आजही होत नाहीये. त्याची कक्षा मर्यादित आहे परतु विचार मेले तर संस्कृती मरते हे नक्कीच. मी सुरुवातीपासूनच प्रस्थापित आणि साचलेल्या व समाजाला घातक असलेल्या विचारांशी संघर्ष करत आलोय. पण माझे कार्यक्षेत्र हे महाराष्ट्रापुरतेच असेल फार तर. मात्र सर्वात जास्त कठीण काम असते ते खोटारड्या आणि शुप्या असलेल्या प्रगतीवादी किवा तथाकथित पुरोगामी आहोत असे स्वताला समजणार्या हौशी पोरकट आणि खुज्या विचारांच्या लोकांशी सामना करणे. असे भरमसाठ लोक आपल्या मराठी समाजात आहेत. हे लोक नेहमीच कुठल्यातरी युगपुरुषांचे नाव घेत असतात .. किवा आपल्या आपल्या जातीतील थोर समजल्या जाणार्या लेखक विचारवंताचे नाव घेत असतात. ज्यां लेखक विचारवंताचे विचार त्यानी मांडले तेव्हाही ते विचार फार काय क्रांतिकारी किवा नवे नसतात किवा ते second source असतात. फार तर उचललेले असतात कुठूनतरी.. अर्थात पाश्चिमात्य जगातुन आणि ज्यानी खरोखरच या मातीतल्या चिंतनातुन विचार मांडले त्या विचारांकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले गेले आहे.


मराठी साहित्य आणि विचार क्षेत्र काही अगदी मोजके अपवाद सोडले तर ते अस्सलतेपासुन कोसो दुर आहे.

मी गेले दहा वर्षे वैचारीक खुली चर्चा करण्याचा प्रयत्न केला त्यातही संपूर्ण देशाचे साहित्य आणि विचारविश्व ज्या उत्तर - आधुनिक किवा आधुनिकोत्तर विचार प्रवाहाला आजही तुसडेपणाने किवा तिरस्काराने पाहते त्याची चर्चा करण्याचा मी जोरदार प्रयत्न केला नंतर कळले की अभ्यास नसताना सर्वजण त्याकडे अदन्यानातुन पाहत आहेत. एवढेच काय तर स्वतःला बुद्धिवंत मानणारे अत्यंत सवंग व पोरकटपणे त्यावर बोलत आहेत किवा पूर्वग्रह दुषित आहेत. प्राध्यापक वर्तुळात तर चर्चा न केलेलीच बरी.. परंतु आज जे महाराष्ट्रभर पसरलेले जे तथाकथित कवी लेखक वगेरे आहेत जे तरुण किवा मागच्या पिढीतील आहेत ( यांचा धंदा काय ? तर तु मला महत्वाचा कवी लेखक बोल मी तुला बोलतो .. तु मला पुरस्कार दे मग तुला मी देतो )

या लोकानीच गृपिंग करुन करुन मराठी साहित्याची आणि वैचारिक क्षेत्राचा सत्यानाश केलाय. वर्तमान पत्रांची कात्रणे जमवुन कादंबरी लिहिणारे हे लोक कुठल्याही चर्चेला तयार नसतात. कित्तेक लोक आजही जुनाट झालेला भालचंद्र नेमाडे यांचा देशिवाद आणि त्यांची समीक्षा अजूनही कवटाळून आहेत ( तरच पुरस्कार मिळत असतात ) कित्येक साहित्याच्या मुख्य धारेतील ब्राह्मणी लेखकानीही नेमाडे यांच्या दिशेने वाटचाल केलीय.. आणि दलित लेखक कवी यानी फ्क्त दलित सबजेक्ट वरच लिहावे आणि अजूनही पुस्तकाच्या मागच्या पानावर प्रस्तावना एखाद्या ब्राह्मण किवा अजुन कुठल्यातरी सो कॉल्ड सवर्ण लेखकाची घ्यायची असा हा अलिखित नियम आहे तो अजूनही पाळला जात आहे ( अत्यंत खेदजनक.. घृणास्पद..कालबाह्य ) 


चर्चा करताना माझ्या लक्षात येत गेले की उत्तर आधुनिकता म्हणजे फ्क्त एक विचारसरणी आहे आणि इथे त्याचे काहीही काम नाहीये... तर काहीना ते बंडल वाटले ... कुणाच्याही गावी नव्हते की ती एक आधुनिकतेच त्याच्या सांस्कृतिकतेच Diconstruction करणारी अती उच्च समीक्षा प्रक्रिया आहे थेट सॉक्रेटिस प्लेटो पासुन आधुनिक तत्वज्ञान आणि साहित्याचे सूक्ष्म वाचन करुन त्यातील सुप्त अंश मुक्त करुन त्या संस्कृतीमधे जो एककेंद्रिवाद आहे.. जो पाश्चिमात्य संस्कृतीचा अहगंड आहे तो उघड करणे  तोही मानवी शास्त्रान्च्या सर्व शाखा व पातळ्यांवरील ... हा एक महाप्रकल्प आहे जो जगभरातील दलित शोषित आणि others असणार्या एका जगाचा सांस्कृतिक आवाज होवु शकतो .. तो आवाज जगभरातीलअनेक  महान university मधे अति उच्च प्रतिभेचे high intellectuals लेखक तत्वज्ञ गेले अर्ध शतक अविरत करत आहेत.. अमेरिकेतील कृष्णवर्णीय चळवळ भारतातील दलित चळवळ अनेक चढाव उतार पाहत आली आहे .. मात्र उत्तर आधुनिक बुद्धीवंतानी हा आवाज सतत मोठ्या पातळीवर आणि मोठ्या बौद्धिक क्षमतेने सुरु ठेवला आहे. 

अर्थात त्याची तोंडओळख करून देण्यासाठी हा लेख नाहीये तर आपले बुद्धीवंत कसे संकुचित आणि कोडगे आहेत अभ्यासापासून दुर पळणारे चर्चा टाळणारे आहेत .. आणि लेखक कवी तर काय आनंदच सगळा ...

तरीही हेच लोक एकमेकांना ठरवतात हा  हा अमुक अमुक लेखक कवी या दशकातील महत्वाचा...  हिम्मत कशी होते या लोकांची... सत्ताधारी याना पुरस्कार देतात त्यानी तर काय वाचलेलेच नसते त्यानी मातीच खाल्ली आहे !


दलित बुद्धिमत्ता पुन्हा पुन्हा आंबेडकर गौरव यातच गुरफटून गेलीय.दलित लेखक कवी विचारवंत यांच्याशी चर्चा करण्याचा हरेक प्रयत्न केलाय मात्र कुणालाही कशाशी काहीही देणेघेणे नाहीये. तर बहुजन वर्ग ज्याला म्हणतात तो एका middle class completion मानसिकतेत गुंतलेला आहे तो एक मोठी leap घेवु पाहतोय आणि कधी नव्हे ते आज धर्मवादी सरकार सत्तेत आहे तेव्हा आपण कोण आहोत नक्की पुरोगामी की धर्मवादी हे कधीही कळलेला नेहमीच संभ्रमित असलेला हा मोठा वर्ग आता स्वतःला सुरक्षित समजत आहे एका "" महान "" धर्माचा मोठा भाग म्हणुन... 

या समाजाला काहीच फरक पडत नाहीये की जग आधुनिक आहे की उत्तर आधुनिक.. 


जे कुणी लिबरल लोक आहेत ना ते ? खरे संधीसाधू..

सनातनी निदान सांगतात आम्ही असे आहोत प्रतिगामी म्हणुन मात्र संत परंपरा लोकशाहीवादी तसेच स्वताला सत्यशोधक म्हणवणारे सर्व्जण एका जुनाट कालबाह्य जाणीवांचे जुने पुराण घेवुन जगत आहेत ..

संपूर्ण जग ज्या कम्युनिस्ट विचाराने एक काळ वेढले होते त्या जागतिक चळवळीला घरघर लागली.. ( सत्ता पाशवी बनते ) मग ते तत्वज्ञान कितीही मानवतावादी असु दे .. त्याचा नाश माणसेच करतात ) ( Bad Communism)

शीतयुद्धाच्या परिस्थितीनंतर जग झपाट्याने बदलले मात्र आपले संत परंपरावाले romantic पुरोगामी लोकशाही समाजवादी आंबेडकरवादी आणि सत्यशोधक कधी बदलले नाहीत.. हे आजही आहेत महानगरात शहरात जिल्यात तालुक्यात गावात थोडे थोडे... आणि निवडणूक आली की हे सगळे मतदान तिथल्या भाईला करतात... तो थेट एखाद्या प्रस्थापित पक्षाचा असतो )


चर्चा करण्याचा प्रसंग आला की रोजचेच उत्तर येते आमची विचार परंपरा थोर आहे ... "" 

कशी काय ? असे विचारले की तोंडावर नावे फेकली जातात .. शिवाजी आणि आंबेडकर...

मग काय कोण बोलणार ... ते थोरच  आहेत. आमचे तोंड बंद .

चर्चा समाप्त.


वैचारीक संवाद यालाच शत्रू मानणारे राजकर्ते आज देशात आणि जगात राज्य करत आहेत. कला आणि साहित्य चित्रपट याला product समजून विकण्याचा काळ आहे. या अंधारात संपूर्ण जगाचेच विचारविश्व आक्रसत चालले आहे. परंतु नव्या विचारांचा आवाज स्वर खालच्या पट्टीत आज लागला तरी जग समाज तरण्यासाठी शेवटी विचारच प्रेरक ठरतात. 


महाराष्ट्र विचार प्रवाहाने अनेक चढ उतार पाहिले आहेत मात्र  तत्वज्ञानाला कधीही प्रतिष्ठा दिली गेली नाही.. नेहमीच चमकदार मांडणी केली गेलीय त्यापुढे इथली सरंजामी बधली नाही कारण तिच्यापुढे कधीही तत्वज्ञानाचे आव्हान नव्हते आणि आजही नाहीये.

कॉ. शरद पाटील यांच्यासारख्या प्रकांड प्राच्यविद्या पंडिताने केलेली मांडणी आजही परिवर्तनाचे हत्यार होवु शकत नाहिय .. त्या अती बौद्धिक मांडणीतही अनेक अंतर्विरोध आहेत ... एका क्षणी कॉमरेड पाटील मग आपली तुलना आंबेडकरांशी करु लागतात आणि कार्ल मार्क्सपासुन सुरु झालेला तो ढण्ढणता विचारवणवा मातृसत्ताक सिध्दांतापर्य्नत येतो ... तो थेट आदी माया ..

रुद्र शिवशंकरापर्यत येतो ... मग कुणीही पेलु शकत नाही कॉमरेड्ना.. स्वीकारणे दुरच ... पण आज जर शरद पाटील यांचेच Decontruction करायची वेळ आली तर त्यांचे समर्थक ? ( हा भयंकर शब्द आहे )  सर्व्जण आपले पुरोगामी झगे उतरुन ठेवतील . आणि म्ह्णणतील बचाओ शरद पाटील खतरे मे है .. गर्व से कहो हम सत्यशोधक है ( पाटील गट ) अगदी ( आठवले आंबेडकर ?,गवई, कवाडे गट ... ) Type.


मराठी साहित्य आणि विचार प्रवाहाचे खरे नुकसान दलित बहुजन वर्गातील तथाकथित लेखक कवी विचारवंत यानी केले आहे कालचे आजचे दोन्हीही..

विचार आणि साहित्य हे शोषित बहुजनाचे प्रकटीकरणाचे माध्यम व्हायला हवे होते .. काही प्रमाणात ते झालेही मात्र इथल्या प्रस्थापित सांस्कृतिक धुरीणांनी जगातील विचारांकडे जाणीवपुर्वक पाठ फिरविली पण तेच इथल्या दलित बहुजनांनी केले..एका बाजुला इथली वैदीक परंपरा मानायची नाही आणि जी अवैदिक परंपरा आहे ती बदलत्या काळाशी सुसंगत करायची नाही .. परिणाम काय ? इथल्या दोन्ही परंपरा साचुन गेल्या. नव्हे विचारच नाही ... वैदीकानी अमुकाला थोर मानायचा आणि अवैदिकानी आणखी कुणाला तरी थोर मानायचा ...


परकीय सत्तेखाली आधीच चिरडलेला आपला समाज स्वातंत्र्यानंर कशाचा सामना करतोय ? हजारो वर्षे झालेल्या वैदिक तत्वज्ञानाचा आणि त्याला विरोधी जाणारे तेवढेच जुने अवैदिक विचार ... ( पण आजही म्हणुनच आजही परकियानी घालून देलेल्या सर्व model वर आज आपण जगत आहोत ... शिक्षणव्यस्थेपासुन रस्त्याच्या फुटपाथ पर्यंत. )


आपण पंढरपूरात गेलो की वारीमधे समतावादी असतो 

आणि घरी आलो की नीव्वळ जातीयवादी. आपण सर्वच.  आयुष्यभ वारी करणाऱ्याला घरी येवुन कळले की त्याची मुलगी एखाद्या खालच्या जातीतल्या मुलाबरोबर गेली आहे.. तर मग सगळी समतेची दिंडी विसरायला होते .. आणि मग होउ शकतो त्या मुलांचा 

"" सैराट ""  हे अस आहे आपल पुरोगामीत्व.. ( मला तर या असल्या पुरोगामीत्वापेक्षा खटारा झालेल्या ST गाड्या  बर्या दिसतात ) 


जगभर रोज  चिंतन होत आहे आणि तेवढेच ते मागेही पडत आहे. आपण आपल्या मुळ विचार परंपरामधील अस्सल काही चांगले घेवुच पण असे म्हणताना त्यातील जे कालबाह्य आहे ते फेकण्याची वेळ खर तर कधीच निघुन गेली आहे .. पाश्चिमात्य जगातील ज्या हिणकस गोस्टी आहे त्या टाळू शकतो आपण. आपले लेखक कवी जे आहेत ते असे काय ग्रेट आणि नवीन सांगत आहेत ? का त्यांची पुस्तके अभ्यासक्रमाला असावी ? खरच काही महत्वाचे भाष्य ते करत आहे का ? नसतील तर त्याची लाज आम्हा कवी लेखकाना वाटायला हवी ... अमेरिकेत काही काळापूर्वी मोठया मोठ्या लेखकांची पुस्तके अभ्यासक्रमाला असु नये ती कालबाह्य झाली आहेत  यासाठी आंदोलने झाली आहेत.. शेक्सपियरवरही बंदी घालावी अशी मागणी होती ... आणि आपल्याकडे कधी अन्कलिपीही पुर्ण न वाचणार्या वशीलेबाज लोकांची पुस्तके अभ्यासक्रमाला लावली जातात ... भीषण !!!"


ज्या दलित विचार विश्वातुन अपेक्षा होती की जगण्याची आणि सांस्कृतिकतेची निकड म्हणून एक मोठा वैचारीक प्रकल्प दलित चळवळ उभारेल असे वाटत होते तिने अपेक्षाभंग केला आहे .... या लोकाना फ्क्त आठवले साहेब काय बोलले .. बाळासाहेब ( प्रकाश आंबेडकर )

काय बोलले ... याच्यातच interest आहे ...

काय बोलणार हे लोक ?  आठवलेनी केलाय कधी सामना Tatal Ambedkar चा की प्रकाश आंबेडकर ना कळेल  की यावेळी सुजात आंबेडकर च्या पिढीसमोर आंबेडकरवाद develope करण्याची कोणती आव्हाने आहेत ....  उत्तर आधुनिककतेत आंबेडकर विचार गुदमरतील की पुन्हा त्याचा रेनेझांस होइल ? 


दीर्घकाळ ' वारशाच्या" आधारे राजकारण करता येणार नाही येणार्या काळात.. हे कळण्या इतके बाळासाहेब नक्कीच उच दर्जाचे बुद्धिवादी आहेत.


Rereading of Ambedkar म्हणजे केवळ बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तके वाचणे नव्हे .. पुन्हा एकदा बदलत्या उत्तर आधुनिक काळात आंबेडकरवादाचा नव्याने अर्थ लावणे व त्याचे विधायक अहिंसक हत्यार बनवणे ... पहायला हवे की आंबेडकर केवळ पाश्चिमात्य विचारानी प्रभावित होते की त्यानी जगाला काही वेगळे विचार दिले आहेत .  कि या त्यांच्या गौरवकाळाच्या भक्तीव्हावाच्या आंधळ्या काळात त्यांच्या Vast लेखनातील वाणीतील  दबलेले अंश तसेच दबुन राहिलेत का ? असतील तर त्याचे अर्थ लावण्याचा हा काळ आहे.


अन्यथा हजारो वर्षेच्या संस्कृतीच्या तथाकथित " थोर ' सुस्त अजगरी विळख्यातच येणारे शतक गुदमरावे  लागेल ....


पुढील लेखात चर्चा करुच.

तोवर धन्यवाद !!


---- Anil kamble Saramalkar.

     ©

………………………

Saturday, February 1, 2020

कोकण Mirror तुमच्या भेटीसाठी

नमस्कार नेटीजन्स हो. . .
कोकण Mirror आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे. आपण नेटीजन्स हेच अशा नवख्या आणि सामाजिक प्रबोधन करू पाहणाऱ्या कोकण Mirror चे सर्वतः आधारस्तंभ आहात. काळ झपाट्याने बदलत आहे. काळाच्या गतीबरोबर धावण्यासाठी मानवी समाज हतबल आहे. आणि तेवढाच तो अधुरा आहे. पण तंत्रज्ञानाच्या आधारे आपण काळाचा पाठलाग करतो आहोत. अगदी प्रकाशाच्या वेगाने. इंटरनेटमय झालेल्या या जगात इंटरनेट न्युज एडिशन असणे, ही काळाची गरज आहे. जगभरच्या मिडियामध्ये, मग तो प्रिंट असो इलेक्ट्रोनिक असो किंवा मग ऑनलाईन अर्थात नेट एडिशन असो, आजचा खरा नटसम्राट म्हणजेच नेटसम्राट. आम्हाला खात्री आहे, आमचे अविरत प्रयत्न आणि तुम्हा नेटीजंसचे प्रेम कोकण Mirror ला नक्कीच नेटसम्राट बनवेल.
आम्ही नेट पत्रकारितेच्या जगात पाय ठेवत आहोत. काळ कुठलाही असो आणि कसाही असो पत्रकारिता ही समाजाची, समाजासाठी समाजाभिमुख असावी लागते. याचे आम्हाला तीव्र भान आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा खांब आहे. तसेच या क्षेत्रामध्ये, आपल्या देशामध्ये हिमालयाच्या उंचीची थोर माणसे होऊन गेली आहेत. या वास्तवाचे भान आणि त्याचा अभिमान कोकण Mirror ला कायम राहील.
नेट एडिशन म्हणजे फास्टफूड. जे काही फास्ट असेल, चमचमीत असेल त्या पॅकेज बरोबर लोकल पासून ग्लोबल पर्यंत सर्व छोट्या मोठ्या महत्वाच्या घडामोडी, आम्ही डिस्प्ले करू. होमपेज पासून इन्फोटेक ते यंगीस्थान तुम्ही सहज क्लिक करू शकता, एका क्लिकवर. आपल्या देशात घडणाऱ्या घटनांपासून थेट युरोप, अमेरिकेत घडणाऱ्या घटना, न्युज रूपाने तुमच्या समोर येत राहतील. सर्वांग सुंदर अशा सह्याद्रीच्या कुशीत वसलेली जिल्ह्यातील गावं, त्यांची ख्याली खुशाली, पश्चिम घाटाच्या संदर्भातले सर्व भौगोलिक सामाजिक व राजकीय कंगोरे कोकण Mirror तुमच्या समोर आणेल. ग्रामीण भागातील समस्या, तरुण नव तरुणांचे प्रश्न, बदलती शहर, त्याचे रंगरूप या साऱ्याचा लेखाजोखा update होत राहील. बदलत्या जनजीवनाचे चित्रण तसेच सिटीझन जर्नालिझममधून सर्व जनांची मते आणि नव्या कॉलेजियन्सची ओपिनियन आपल्या या आवडत्या न्युज पोर्टलवर वाचता येतील. आणि इतकच नव्हे तर तुम्हाला स्वतः यामध्ये सहभागी होता येईल. हे तुमचे हक्काचे पोर्टल आहे.
कोकणच्या या तांबड्या मातीत ऑनलाईन जर्नालिझमची परंपरा आताशा कुठे सुरु होत आहे. यामध्ये कोकण Mirror ला महत्वाचे स्थान मिळवायचे आहे. ऑनलाईन जर्नालिझम आता सर्वत्र कॉमन होत आहे, पुढेही होणार आहे. या माध्यमाची ताकद तंत्रज्ञानावर आधारलेली असली, तरीही ज्या शेवटच्या झोपडीत तंत्रज्ञानाचा चिमूटभरही प्रकाश पोचला नाही, अशा दुर्बल घटकांना बळ देण्याची ताकद, त्यांचे प्रश्न आणि वेदना जगाच्या डिजिटल चावडीवर मांडण्याचे सामर्थ्य या माध्यमात आहे. याचा अर्थ ऑनलाईन जर्नालिझम खरा समाज आणि खरी लोकशाही बळकट करणारे माध्यम आहे.
कोकण Mirror कडून आपण सर्वांनी अपेक्षा ठेवणे रास्त आहे, त्याचबरोबर आपण सर्वांनी वेळोवेळी तो अपडेट करून आपली मते, विचार आणि बातम्याही शेयर करून कोकण Mirror फास्ट करावा. आमच्या यंग नेटीजंसहो इन्फोटेक हे सेग्मेंट हे खासच तुमच्यासाठी बनवलं आहे. आपल्याला सतत आपल्या टॅब किंवा मोबाईल विषयी विविध समस्या जाणवत असतात. एखादा प्रोग्राम इनस्टॉल कसा करायचा इथ पासून ते मराठी टायपिंग कसं करायचं अशा तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या सेग्मेंटमध्ये मिळतील.
मित्रहो! कुठल्याही प्रवासाला निघतांना, आपलं स्वतःचा डेस्टीनेशन आपल्याला माहित असतं. पण वाटेत आपल्याला माहित नसलेली अनेक छोटी मोठी स्टेशन्स लागतात. अगदी तसचं प्रत्येक क्षेत्रामध्ये घडत असतं. या छोट्या मोठ्या stop वरच अनेक मोहाचे, कसोटीचे आणि दबावाचे प्रसंग येतात. आपणा सर्वांना माहीत आहे. नेट पत्रकारिता म्हणजे ट्वेंटी -२० चा सामना असतो. पण पत्रकारितेचा मूळ प्राण आहे तो समाजाचे प्रबोधन. अर्थात दीर्घ कसोटीचा सामना. आणि हा कसोटी सामना कोकण Mirror कदापीही गमावणार नाही! आणि तो आपल्या सर्वांच्या जीवावर . . .
Advertisements