Saturday, June 20, 2020

देवघर प्रकल्पातून सोमवार पासून पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा


सिंधुदुर्गनरी : देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे. त्यामुळे धरणाच्या विद्युत विमोचकाव्दारे सोमवार दि. २२ जून रोजी दुपारी ०३.०० वा. पासून घ.मी. प्रतीसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे.
                तरी नागरिकांनी पुढील खबरदारी घ्यावी नदीपात्रातील प्रवाह कधीही वाढू शकतो त्यामुळे जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी नदीपात्रात उतरु नये व सावधानता बाळगावी. रात्रीच्या वेळी नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये. नदीपात्रात कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिला, नदीपात्रात पाण्यासाठी गुरे सोडणारे शेतकरी यांनी या बाबत आवश्यक ती खबरदारी बाळगावी. घोणसरी, लोरे नंबर, , लोरे नंबर, गडमठ,  पियाळी, वाघेरी या ग्रामपंचायतीनी धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याची दवंडी पिटवून माहिती द्यावी. तालुक्यातील शोध व बचाव गटातील सदस्यांना सतर्कतेच्या सूचना द्याव्यात. शोध व बचाव साधने तयार ठेवावीत. एखादी आपत्तीजनक स्थिती उध्दभल्यास त्या बाबत जिल्हा नियंत्रण कक्षात त्वरीत माहिती द्यावी, असे शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग या कळवितात.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.