Saturday, June 20, 2020

कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथे कंटेन्मेंट झोन


सिंधुदुर्गनगरी : कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील गोंधळपूर, मुस्लिमवाडी हे केंद्रबिंदु मानुन, पिंगुळी-गोंधळपूर, मुस्लिमवाडीच्या ५०० मीटरचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक जुलै रोजीपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तूविक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे जाणे व सर्व प्रकारच्या वहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही असे आदेश कुडाळच्या उपविभागीय अधिकारी वंदना खरमाळे यांनी दिले आहेत.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.