सिंधुदुर्गसह ६ जिल्हे ग्रीन झोनमध्ये.....
सिंधुदुर्गवासीयांना मोठा दिलासा....
टिम KONKAN मिरर:-मुंबई
राज्य सरकारने नुकतीच जाहिर केली सुधारित यादि.या यादिनुसार सिंधुदुर्गसह ६ जिल्हे ग्रीन झोनमध्ये आहेत.
रत्नागिरीत मात्र ऑरेंज झोन लागू .कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नव्याने जाहीर केली झोनची यादी ; रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये ३६ ठिकाणांची विभागणी.सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ग्रीन झोन मध्ये समावेश झाल्याने लॉकडाऊन मध्ये जिल्हावासियांना दिलासा मिळणार आहे.मुंबई, मुंबई उपनगरसह,पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगाव आदी जिल्ह्यांचा रेड झोन मध्ये समावेश.तर रत्नागिरी, रायगडसह, अहमदनगर, अमरावती, बुलढाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, जालना, नांदेड, चंद्रपूर, परभणी, सांगली, भंडारा, बीड, लातूर या जिल्ह्यांचा ऑरेंज झोनमध्ये सहभाग आहे. सिंधुदुर्गसह, उस्मानाबाद, वाशीम, गोंदिया, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यांचा केवळ ६ जिल्हयांचाच ग्रीन झोनमध्ये समावेश आहे.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.