Friday, May 1, 2020

झाडे पडून विद्युत वाहिन्या तुटल्याने आंबेली येथे विद्युत सेवा बंद...

वाहिनीवरील झाडे तोडून आज साफसफाई, ग्रामस्थ, युवकांचे सहकार्य..

दोडामार्ग :- असीम वागळे
दोडामार्ग-तिलारी मार्गावर आंबेली येथील माळरानावर आग लागल्याने कमकुवत झाडे रस्त्यांशेजारील विद्युत वाहिनीवर पडल्याने वाहिन्या तुटुन रात्री १० वा. विद्युत प्रवाह बंद झाला. त्यामुळे स्थानिक युवक, ग्रामस्थ यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत विद्युत कर्मचारी यांच्या सहकार्याने विद्युत सेवा बंद करण्यात आली. त्यानंतर रात्री विद्युत विभागचे अधिकारी घटनास्थळी दाखल होत. रात्री ११ विद्युत प्रवाह सुरु केला. आज रस्त्यांशेजारील वाहिनीच्या जवळील झाडे तोडुन साफसफाई करण्यात येत आहे. विद्युत कर्मचारी, स्थानिक युवक, ग्रामस्थ उपस्थित आहेत.
 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.