भाजपच्या सोशल मिडीया अध्यक्षासह एकावर गुन्हा दाखल
कुडाळ:-पवन मेहत्तर
मुख्यमंत्री मा.ना.उद्धवजी ठाकरे यांच्याबाबत बदनामी करणारी पोस्ट करणाऱ्या भाजपच्या सोशल मिडीया अध्यक्ष राजवीर गांगुर्डे पाटील आणि विकास पवार या दोघांविरोधात कुडाळ पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली होती. युवा सेना जिल्हा समन्वयक सुशिल चिंदरकर यांनी ही तक्रार दाखल केली होती.मा.उद्धवजी ठाकरे यांच्यावर हे दोघेही अतिशय खालच्या पातळींवर टीका करत होते. त्यापैकी राजवीर पाटील याला काल संध्याकाळी कुडाळ पोलीसांनी अटक करुन गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरा आरोपी विकास पवार याचा पोलीस शोध घेत आहेत.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.