महाराष्ट्रातील इतर कर्मचारी व शिक्षक यांनी सरकारने दिलेल्या सूचना पाळाव्यात, गडबडून जाऊ नये : दयानंद नाईक
मुंबई:-प्रतिनिधी
१ मे नंतर २ मे पासून सुट्टी सुरू होईल. कोरोनामुळे शाळा, कॉलेज कधी सुरू होतील याची शाश्वती नाही. या परिस्थितीमध्ये मुंबई मधील ज्या शिक्षक व कर्मचारी यांना स्वखर्चाने आपापल्या गावी जायचं असेल आणि त्यांना काही अडचण येत असेल तर विधान भवन नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून मदत करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यासाठी आपलं स्वतःचं नाव, वय आणि मोबाईल क्रमांक, कुटुंबातील इतर सदस्यांची नावं, वयं, सध्या राहत असलेला पूर्ण पत्ता, जिथे जायचं आहे तो पूर्ण पत्ता, अशी माहिती तातडीने shikshakbharatimumbai@gmail.com यावर ईमेलने पाठवावी असे आवाहन मुंबई विभाग शिक्षक मतदार संघ आमदार कपिल पाटील यांनी केले आहे. महाराष्ट्रातील इतर कर्मचा-यांसाठी लवकरच निर्णय घेण्यासाठी आमदार कपिल पाटील प्रयत्न करत आहेत. आपल्या गावी जाण्यासाठी आतूर असलेल्या कर्मचारी व शिक्षक यांनी गडबडून जाऊ नये. तोपर्यंत जिथे आहात तिथेच राहावे, सुरक्षित राहा असे आवाहन शिक्षक भारती राज्य उपाध्यक्ष दयानंद नाईक यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.