Wednesday, May 20, 2020

लॉकडाऊनच्या काळात अवैध मद्य वाहतूक करणाऱ्या १०६ जणांवर कारवाई, ९१ गुन्हे दाखल - दीक्षित गेडाम

सिंधुदुर्गनगरी : प्रसाद नाईक

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात म्हणजेत २३ मार्च रोजीपासून आजपर्यंत अवैध दारू वाहतूक करणाऱ्या १०६ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. तर या प्रकरणी आतापर्यंत ९२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यांमध्ये एकूण १ कोटी ७८ लाख ३१ हजार ८३६ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे. 
जिल्ह्यामध्ये दिनांक २३ मार्च रोजी पासून कलम १४४ अंतर्गत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तेव्हापासून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये अवैध दारू वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यामध्ये १७ वाख ८७ हजार ६३२ रुपये किंमतीचा मुद्देमाल व १ कोटी २८ लाख १० हजार २०४ रुपये किंमतीची अवैध वाहतूक करणारी वाहने जप्त करण्यात आली आहेत. 
बांदा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दिनांक १९ मे रोजी पत्रादेवी तपासणी नाक्यावर वाहन तपासणी सुरू असताना गुजरात राज्यात माल वाहतुकीसाठी जाणाऱ्या वाहनातून गोवा बनावटीच्या दारुची वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तात्काळ कारवाई करून २० लाख ३४ हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारी व १ लाख २० हजार रुपये किंमतीचा माल वाहतुकीचा कँटर जप्त करण्यात आल्याचेही पोलीस अधिक्षक दीक्षित गेडम यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.