Wednesday, May 20, 2020

संस्थात्मक विलगीकरण कक्षाकडे पोलीस गस्त सुरू

सिंधुदुर्गनगरी : अमीत तेंडोलकर

जिल्ह्यात येणाऱ्या परजिल्ह्यातील व परराज्यातील नागरिकांना संस्थात्मक अलगीकरणामध्ये ठेवण्यात येत आहे. त्या अनुषंगाने या संस्थात्मक अलगीकरणाच्या ठिकाणी पोलीस गस्त सुरू करण्यात आली आहे. दिनांक २० मे रोजी पासून नेमुन दिलेले गस्ती पथक कक्षांच्या ठिकणी भेट देत आहे. 
संपूर्ण जिल्ह्यामध्ये संस्थात्मक अलगीकरणाच्या ठिकाणी गस्तीसाठी २० पोलीस पथके तयार करण्यात आली आहेत. त्यामध्ये ३० वाहने, ३० पोलीस अधिकारी, अंमलदार, सेक्टर पेट्रोलिंग यांचा समावेश आहे. तसेच  संस्थात्मक विलगीकरण कक्ष बंदोबस्तासाठी २२० होमगार्ड कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.  ही पथके त्यांना ठरवून दिलेल्या गावांच्या हद्दीतील तसेच पोलीस ठाणे हद्दीतील गावांमधील संस्थात्मक विलगीकरण कक्षांना भेटी देऊन सुरक्षा व इतर परिस्थितीचा आढावा घेणे, नियंत्रण समितीशी समन्वय ठेवणे, कयदा व सुव्यवस्था अबाधित राहील या दृष्टीने पेट्रोलिंग करणार असल्याची माहिती पोलीस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी दिली आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.