द सक्सेस स्टोरीज
Covid-19 लॉकडाऊन - 2020
विशेष प्रतिनिधी:-असीम वागळे
लेखणी:-अविनाश पराडकर
माणसाचा जगण्याचा संघर्ष रोजचा आहे. आज कोरोना व्हायरसचा धोका सर्वोच्च आहे, याचा अर्थ हार्टअटॅक, ब्रेन हॅमरेज, बीपी, कॅन्सर यासारखे जुने शत्रू रजेवर गेलेले आहेत असा त्याचा अर्थ नाही. पण कोरोना विरोधातील अचानक लढाईत आपले सैन्य गोंधळले आहे हे वास्तव आहे. हि राजकारण करण्याची वेळ नाही असं म्हणत रोजच राजकारण होतं आहे. अर्थात पूर्वी कधी काळी समाजकारण हाच समाजाच्या एकत्र येण्यासाठीचा केंद्रबिंदू होता, ती जागा आता छोट्या छोटया गटातून राजकारणाने घेतली आहे हे वास्तव आहे. समाज दुभंगलाय! हे बदलायला हवं!!
कोणतीही वाटचाल हि पहिल्या पावलाने सुरु होते असं म्हणतात. आणि बदलाच्या प्रेरणेचे हे पहिले पाऊल राजकारण्यानीच टाकलं असेल तर....
आपण फक्त विरोधात काम नाही करत हे सिंधुदुर्ग भाजपाने दाखवून दिलं, तर विरोधी पक्षाकडून सुद्धा चांगली सूचना आली तर त्यावर सत्ताधाऱ्यांनी कसे काम करायला हवे ते शिवसेनेच्या पालकमंत्र्यांनी दाखवून दिलं. एक आश्वासक बदल राजकारणात दिसला. हि स्टोरी आहे भाजपाचे माजी आमदार प्रमोद जठार, सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत आणि रत्नागिरीचे पालकमंत्री, तथा अनिल परब या सिंधुदुर्गच्या पुत्रांच्या सिंधुदुर्गवासीयांसाठीच्या लढाईची! राजकारणापलीकडे जात जनतेसाठी प्रशासन नेण्याच्या स्तुत्य प्रयत्नांची! त्यांना साथ देणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, डॉक्टर कुलकर्णी, डॉक्टर अनिरुद्ध मुद्राळे आणि ॲम्ब्युलन्स चालक हेमंत वागळे यांचीही!
सक्सेस स्टोरी स्टार्टस हिअर!!
हि पहिली सक्सेस स्टोरी सुरु होतेय सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पडवे येथील एसएसपीएम हॉस्पिटल मधून!
चार महिन्यांपूर्वी मुंबईतून होळीसाठी फणसगावला आपल्या घरीआलेले कोकाटे कुटुंब! त्या कुटुंबातली भूमी हि अवघ्या अकरा वर्षाची मुलगी पंधरा दिवसांपूर्वी तापासाठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाली होती. ताप डोक्यात केला होता आणि ती कोमात गेली होती. उपचारांच्या शर्थीने ती शुद्धीत आली पण आता तिला मेंदूच्या उपचारांसाठी न्यूरोसर्जनची गरज होती. कुटुंबियांनी मदतीसाठी प्रमोद जठारांशी संपर्क केला. त्यांनीही तातडीने न्यूरोसर्जनसाठी नजीकच्या गोवा, कोल्हापूरमध्ये कॉन्टॅक्ट केला, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही घ्यायला तयार नव्हते. पेशंट शुद्धीवर आल्यानंतर हॉस्पिटलने सांगितलं की आता इथे काही व्यवस्था होणार नाही, लॉकडाऊनमुळे न्यूरोसर्जन पोहोचू शकत नाही, तुम्ही कोल्हापूर, मुंबई किंवा गोवा कुठेतरी पेशन्टला तातडीने हलवा. अन्यथा जीवाला धोका आहे.
प्रमोद जठारांनी पुढच्या प्रक्रियेत स्वतःला गुंतवून घेतलं. शल्यचिकत्सक डॉक्टर कुलकर्णींशी ते सातत्याने संपर्कात राहिले. जीव वाचवण्यासाठी मुंबई किंवा कोल्हापूरला घेऊन जावे लागेल यावर डॉक्टर ठाम होते. कोल्हापूरमध्ये उपचारांच्या दृष्टीने अडचणींचे प्रमाण जास्त होते. शेवटी बोरिवलीतल्या न्यूरोसर्जनची अपॉइंटमेन्ट घेतली गेली.
सिंधुदुर्गची शासकीय आरोग्यवाहीनी 108 सेवेची ॲम्ब्युलन्स काही सिंधुदुर्ग सोडून पुढे जायला तयार नव्हती. शेवटी भाजपा नेते विनोद तावडे यांनी जी बांद्याला दिलेली ॲम्ब्युलन्स होती, तिथे जठारांनी संपर्क साधला. लॉकडाऊनमध्ये अडकले असतांनाही त्यांची प्रयत्नांची शिकस्त चालली होती.
ती ॲम्ब्युलन्स सावंतवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयाकडे होती. हेमंत वागळे नावाचा युवक ती व्यवस्था पहात होता. परिस्थितीचे गांभीर्य जाणून तो प्रमोद जठारांना म्हणाला, "साहेब, काळजी सोडा!मी घेऊन जाईन पेशन्ट मुंबईत, मी सोडतो बोरीवलीत हॉस्पिटलला!"
आता तिच्याबरोबर कोणीतरी डॉक्टर असणे गरजेचे होते. दोन तासांनी इंजेक्शन द्यायचं असतं. इंजेक्शन नाही दिलं तर परत ताप डोक्यात जाईल हा धोका होता. तिथे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डॉ.अनिरुद्ध मुद्राळे आहेत, त्यांनी ही जबाबदारी घेतली अंगावर! चला मी जातो, म्हणाले! जे काय होईल ते होईल! ही टीम निघाली पेशन्ट घेऊन.
आता प्रमोद जठारांनी पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांना परिस्थितीचं गांभीर्य सांगून मदत मागितली. खरं तर लॉकडाऊननंतर सिंधुदुर्गच्या या पोलीस अधीक्षकांच्या मोबाईलचा सुद्धा सत्कार व्हायला हवा एवढा त्याने कामाचा ताण जबाबदारीने उचललाय! प्रमोद जठारांनी त्यांना फोन करून विनंती केली की साहेब, एका कोवळ्या जीवासाठीची हि इमर्जन्सी आहे. वेळेत उपचार झाले नाहीत, तर परत ती पोरगी कोमात जाईल आणि सगळंच पॅनिक होऊन जाईल! पोलीस अधीक्षकांनीही कार्यवाही करून पुढच्या सूचना देत म्हंटलं की पेशन्ट जाऊ दे! बाकीचं मी पाहतो, जिल्हाधिकारी मॅडमशी मी बोलतो. फक्त सोडून येताना मला फोन करा. शक्यतो मुंबईत रेडझोनमध्ये न जाता अलीकडून पेशन्ट दुसऱ्या ॲम्ब्युलन्समध्ये शिफ्ट करता येतो का पहा, म्हणजे मग या वाहक व डॉक्टरना क्वारंटाईन करून ठेवायची गरज पडणार नाही!
ॲम्ब्युलन्स सिंधुदुर्ग सोडून रत्नागिरीमार्गे चालली होती. प्रमोद जठार यांनी मुंबई महापौर किशोरी पेडणेकरना फोन करून अधिक्षकांच्या सुचनेप्रमाणे काही व्यवस्था होते का याची चाचपणी केली. पण त्या म्हणाल्या की सध्या आपल्याकडे तशी काही व्यवस्था नाहीय. दरम्यान हेमंत वागळे आणि डॉ.अनिरुद्ध मुद्राळे छोट्या भूमीला बोरिवलीला सुखरूप सोडून पाठी परतले.
येतांना खारेपाटणला अडवून क्वारंटाइन होण्याच्या सूचना दिल्या गेल्या. रात्री उशिरा परततांना दुर्दैवाने बिबवण्यात या ॲम्ब्युलन्सला अपघात झाला. पण सत्कार्याचे आशीर्वाद फळाला आले नि सुदैवाने फारसे काही विपरीत न होता किरकोळ नुकसानीवर भागले. आता दोघेही चौदा दिवसाच्या क्वारंटाइनवर आहेत. सलाम त्यांच्याही लढाईला!
सावंतवाडीत हि स्टोरी संपत नाही, तोवर प्रमोद जठार यांना ओरोसमधून दुसरा कॉल आला वैभववाडीत गावाकडे रहात असलेले इंदुलकर नावाचं वृद्ध दांपत्य! बाकी मुलं नि परिवार ठाण्यात लॉकडाऊन!!
त्या वृद्धेला पॅरॅलेसीसचा झटका आला. चार महिने म्हातारा - म्हातारी गावाला होते, म्हातारीच इथे जेवणखाण करत होती. मुलं होती ठाण्यात, आता परत पेशन्टला ठाण्यात सोडण्याशिवाय पर्याय नव्हता! त्यासाठीच फोन होता. आता परत एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होणार होती. आधीच एक चालक आणि डॉक्टर नुकतेच क्वारंटाइन झालेले! दुसरे.... तिसरे... असे किती डॉक्टर्स आणि चालक आणायचे? आणि आणायचे तरी कुठून?
प्रश्नाचे दीर्घकालीन गांभीर्य समोर उभे राहिले. प्रमोद जठारांनी हि परिस्थिती सत्ताधारी पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक यांच्या कानावर घातली. राजकारण करण्याची ही वेळ नाही हे सिद्ध करण्याची वेळ आता सर्वांवरच आली होती. अनेकांशी चर्चा करताना जठार आपले पत्रकार मित्र राजेश कोचरेकर त्यांच्याशी बोलत होता. पत्रकार राजेशनी परिस्थिती आणि वेळेचे गांभीर्य ओळखत रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब आणि प्रमोद जठार यांच्यामधला दुवा होणं पसंत केलं. त्यांनी कॉन्फरन्सवर अनिल परब यांना घेतलं. तसेही अनिल परब त्यांच्याशी जठारांचे चांगल्या मैत्रीचे संबंध होतेच. त्यांनीही सविस्तरपणे विषय व परिस्थिती समजुन घेतली. प्रत्येक पेशन्टमागे जर एक चालक आणि एक डॉक्टर क्वारंटाइन व्हायला लागला, तर काय स्थिती होईल आरोग्य यंत्रणेची? अनिल परबना विषय क्लिक झाला. ते गंभीर झाले.
रात्री उशिरा प्रमोद जठार यांना रत्नागिरीचे पालकमंत्री असलेल्या अनिल परब यांचा फोन आला. या विषयाकडे लक्ष वेधल्याबद्दल आधी त्यांनी जठारांचे आभार मानले. मग म्हणाले की तुमच्या सूचनेप्रमाणे सर्व व्यवस्था केली आहे. आरोग्य विभागाच्या प्रिन्सिपल सेक्रेटरीची बोललोय, ते सर्व संबंधित जिल्हा शल्यचिकित्सकांशी बोलतील! ॲम्बुलन्स मुंबईत एन्ट्री करायच्या आधी शासनाच्या चार ॲम्ब्युलन्स मुंबईच्या अलीकडे उभ्या असतील. असेच कोण अन्य पेशंट असतील तर आम्ही हॉस्पिटलशी बोलतो, त्यांना तिथपर्यंत पोहोचवा. तुमच्या ॲम्ब्युलन्स आणि डॉक्टर परत जाऊ शकतील. त्यांना क्वारंटाईन होण्याची गरज पडणार नाही. मी प्रिन्सिपल सेक्रेटरींशी बोलून हे सर्व करून घेईन."
हि सक्सेस स्टोरी इथे संपते. सर्वांच्या चांगल्या संपर्कातून एक जटिल प्रश्न मार्गी लागला. पत्रकार राजेश कोचरेकर यांची मध्यस्ती फळाला आली होती.
प्रमोद जठार यांनी फोन करून या प्रकाराची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना दिली. त्यांचेही सकारात्मक प्रयत्न या लढाईत आजवर मोलाचे ठरलेले आहेत. मी सर्व माहिती व सूचना घेऊन पुढील कार्यवाही त्वरेने करेन या शब्दात त्यांनीही आश्वस्त केले.
इथे भाजपाचे आणि विशेषत: प्रमोद जठारांचे कौतुक केलेच पाहिजे की लॉकडाऊनमध्ये अडकूनही घरबसल्या हि स्टोरी त्यांनी घडवली. सत्ता असो वा नसो, शासन प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या सहयोगातून ही सर्व सिस्टीम कशी बसवता येते हे त्यांनी कृतीतुनच दाखवुन दिले आहे.
अशा सिस्टीम्स लावण्याची गरज आहे. अशा आणखीही सक्सेस स्टोरीज घडण्याची गरज आहे. जर त्या मुलीच्या बाबतीत दुर्दैवाने काही विपरीत झाले असते, तर तिच्या आईवडिलांनी या सगळ्या सिस्टीमला कधीच माफ केले नसते. पण त्यांचा प्रशासकीय सिस्टीमवर भरोसा राहण्यासाठी इथे लोकप्रतिनिधी, विरोधी पक्ष, शासन, प्रशासन, सेवा यंत्रणा सर्वानीच एक लढाई चांगल्या पद्धतीने जिंकली आहे. सर्वांचे कौतुक अभिनंदन आहे!
.... अशा आणखी अनेक सक्सेस स्टोरीज वेगवेगळ्या क्षेत्रात घडल्या पाहिजेत! कोरोना विरोधातले हे युद्ध तर आपल्याला जिंकायचेच आहे. पण हि फक्त जीवन-मरणाचीच लढाई नाहीय, तर त्यापेक्षा अधिक त्यातल्या माणुसकीची लढाई आहे!!

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.