वेत्ये उपसरपंच गुणाजी गावडे आणि बाळू गावकर यांची मदतीसाठी धाव.
सावंतवाडी:-सुविधा वागळे
मुंबई गोवा हायवे वर वेत्ये येथे अपघात होवून दुचाकीने प्रवास करणारे दोन युवक जखमी झाले आहेत.या युवकांना वेत्ये गावचे उपसरपंच गुणाजी गावडे आणि बाळू गावकर यांनी या जख्मी युवकांना त्या ठिकाणी जाऊन मदत केली. तसेच प्रसाद कोरगावकर यांच्या रुग्णवाहिकेतून सावंतवाडी शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे दोन्ही युवक कुडाळ येथील असून त्या युवकाची नावे समजू शकली नाही आहेत. तसेच सावंतवाडी पोलिस स्टेशनला घटनेची कल्पना दिली असल्याची माहिती ही उपसरपंच गुणाजी गावडे यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.