Friday, May 1, 2020

रत्नागिरीत सापडले कोरोनाचे दोन नवे रुग्ण.

परिस्थितीचा सामना करूया : जिल्हाधिकारी

रत्नागिरी:-निलेश कुडतरकर
जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिपळूण येथे एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण जे जे हॉस्पिटल परिसरातून येथे आला आहे.तसंच संगमेश्वर इथंही एक रुग्ण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. हा रुग्ण ठाण्यातून आला आहे. प्रशासनाने या रुग्णांना वेगळं ठेवलं असून, त्यांच्या संपर्कातील सर्वांचे स्वँब तपासणीसाठी घेतले आहेत.
दोन्ही तालुक्यातील दोन्ही रुग्णाच्या परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.आलेल्या परिस्थितीचास सामना करूया. नागरिकांनी घाबरुन न जाता आवश्यक ती दक्षता घ्यावी , असं आवाहन जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी केलं आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.