Friday, May 1, 2020

तेर्सेबांबर्डे येथे मालवाहू ट्रकला भीषण अपघात...

पिता ठार तर पुत्र गंभीर जखमी!


कुडाळ:-पवन मेहत्तर
मुंबई-गोवा महामार्गावर काल शुक्रवारी रात्री ११:०० वाजण्याच्या सुमारास लोखंडी चॅनल वाहतुक करणारा मालवाहक ट्रक गोव्याच्या दिशेने जात होता. दरम्यान सदर मालवाहक ट्रक कुडाळ, तेर्सेबांबार्डे येथील शेणई यांच्या बंद घरात घुसुन मोठा अपघात झाला. सदर अपघातात ट्रकच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला असुन ट्रक चालक हिरालाल घनश्याम सिंह (वय ५०) हे ठार झाले आहेत, तर त्यांच्यासोबत क्लीनर मुलगा अमृत हिरालाल सिंह हे जखमी झाले आहेत. कुडाळ पोलिस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.