Friday, May 1, 2020

कारिवडे येथे युवक काँग्रेस मार्फत मदत कार्य...

गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप...

सावंतवाडी:- संजोग जाधव 
सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे गावात आज तालुका युवक काँग्रेसच्या वतीने गरजू कुटुंबांना जिल्हा काँग्रेस अध्यक्ष बाळा गावडे यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. तरी या प्रसंगी युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, सावंतवाडी काँग्रेस तालुका खजिनदार ॲडवोकेट राघवेंद्र नार्वेकर, तसेच जिल्हाध्यक्ष बाळा गावडे उपस्थित होते. कारिवडे गावातील गरजवंतांना योग्य त्या वेळी मिळालेल्या मदतीबाबत ग्रामस्थांमधून तालुका काँग्रेस बाबत गौरवोद्गार काढले जात आहेत.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.