Friday, May 1, 2020

संकट हे कोरोना विषाणूच्या महामारीचे

*_🧣पण दिवस आता जवळ आले उपासमारीचे🧣_*

*_🔖लॉकडाऊन मुळे व्यवसायही बंद असल्याने रानबांबुळी येथील पडते कुटुंबीय उपासमारीच्या जवळ..🔖_*

*_✍️सिंधुदुर्गनगरी :-पवन मेहत्तर_*
Covid-19 च्या पार्श्वभूमीवर आज संपूर्ण भारत देश लॉकडाऊनच्या परिस्थितीत असल्याने, याचा परिणाम व्यावसायिक व व्यवसायावर अवलंबून असलेल्या कुटुंबावर मोठ्या प्रमाणात होत आहे. याच अनुषंगाने सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाच्या अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या, रानबांबुळी या गावात बरेचशे स्टॉलधारक तसे हॉटेल व्यावसायिक आहेत. त्याचप्रमाणे सदर परिसरात सुकामेवा, काजूगर यांसारख्या दुकानांची मांदियाळी आहे. रानबांबुळी येथे असलेले सातेरी कॅश्यु पॉइंट व काजू दरबारचे मालक पडते बंधू यांचेही दुकान सध्या बंद स्थितीत आहे. परंतु फक्त दुकानावर कुटुंबीयांची उपजीविका असल्यामुळे सद्यपरिस्थितीत त्यांचे अतोनात हाल होत आहेत. तसेच त्यांच्या दैनंदिन गरजांचा प्रश्नही ऐरणीवर आलेला आहे. तरी याबाबतचा प्रशासनाने योग्य तो पाठपुरावा करून आपल्या सोबतच अन्य दुकानदार बांधवांना नुकसान भरपाई देऊन प्रशासनाने उपकृत करावे, अशी मागणी सातेरी काजू दरबार चे मालक पडते यांनी कोकण मिरर न्यूज चॅनेलशी बोलताना केली.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.