Monday, May 25, 2020

खरीप भात लागवडीबाबत चर्चासत्र संपन्न


सिंधुदुर्ग : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव व जवळ येत असलेला शेतीचा हंगाम या खरीप पार्श्वभूमीवर भात  लागवडीसह शेतीचे नियोजन कसे करावे? यासाठी भात संशोधन केंद्र शिरगाव – रत्नागिरी, कृषि विज्ञान केंद्र किर्लोस - सिंधुदुर्ग व रिलायंस फाउंडेशनने यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील मालवण, वेंगुर्ला, कुडाळ तालुक्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञांनाच्या ध्वनी चर्चासत्राद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात भात संशोधन केंद्र शिरगाव रत्नागिरी (डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत) प्रभारी अधिकारी डॉ. भरत वाघमोडे यांनी तज्ञ मार्गदर्शक म्हणून शेतकऱ्यांना भात  लागवडी विषयी मार्गदर्शन केले.
      यावेळेस डॉ. वाघमोडे यांनी शेतकऱ्यांना भात लागवडीसाठी जमिनीची मशागत आपल्या प्रभागांनुसार वाणाची निवड कशी करावी? विविध भात वाणाची लागवड कालावधी व त्याची योग्य  नियोजन, भात  लागवडीच्या विविध शास्त्रीय पद्धतीभात लागवडीनंतरचे नियोजन, खत व्यवस्थापन, रोपवाटिका नियोजनभात संशोधन केंद्रामार्फत विकसित  केलेल्या विविध भात वाणाची माहिती शेतकऱ्यांना करून दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भात लागवड करताना शारीरिक अंतर कसे राखावे? याबाबत मार्गदर्शन विज्ञान केंद्र, किर्लोस मालवणचे कृषि विस्तार तज्ञ डॉ. विलास सावंत यांनी केले.
      रिलायन्स फाउंडेशनचे कृषितज्ञ सचिन मताले यांनी शासनाच्या विविध योजनाची माहिती दिली.  कार्यक्रमाचे व्यवस्थापन रिलायन्स फाउंडेशनचे सिंधुदुर्ग जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे, यांनी केले तसेच कार्यक्रमाची तांत्रीक  बाजू रिलायन्स फाउंडेशनचे धम्मदीप गोंडाणे व नियोजन गणपत गावडे यांनी केले. कार्यक्रमाला शेतऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.