Wednesday, May 27, 2020

जिल्ह्यातील ११६ अहवाल निगेटीव्ह

जिल्ह्यातील ११६ अहवाल निगेटीव्ह - जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी : कृष्णा तुळसकर

जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णाच्या अतीजोखमीच्या संपर्कातील आणखी ८ व्यक्तींचे घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तर काल पाठविलेल्या ५९ नमुन्यांचे अहवाल येणे बाकी आहे. जिल्ह्यातील ११६ अहवाल काल निगेटीव्ह आले आहेत.  
जिल्ह्यात एकूण २४ हजार ७५९ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून त्या पैकी ४०९ व्यक्ती या शासकीय संस्थात्मक अलगीकरण कक्षात आहेत. तर २४ हजार ३५० व्यक्तींना गावपातळीवरील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर जिल्ह्यात प्रवेश केलेल्या इतर सर्व नागरिकांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण १ हजार ५५२ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी १ हजार २९८ तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील १७ अहवाल पॉझिटिव्ह आले असून उर्वरीत १ हजार २८१ अहवाल निगेटीव्ह आले आहेत.  अजून २५४ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या १०७ रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी ७१ रुग्ण डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटलमध्ये, ३६ रुग्ण डेडिकेटेड कोवीड हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी ५ हजार ८८० व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण १७ कोरोना बाधीत रुग्णांपैकी ७ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून सध्या १० रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. 
परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि.  2 मे पासून आज अखेर एकूण ४५ हजार ४३६ व्यक्ती दाखल झाल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.