जिल्ह्यात एकूण १६ हजारांपेक्षा जास्त व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात - जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी
सिंधुदुर्गनगरी : सुशांत राणे
जिल्ह्यात एकूण १६ हजार ३७८ व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात असून त्या पैकी ५१५ व्यक्ती या शासकीय संस्थात्म अलगीकरण कक्षात आहेत. तर गावपातळीवर १५ हजार ८६३ व्यक्तींना गावपातळीवरील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. तर जिल्ह्यात प्रवेश केलेल्या इतर सर्व नागरिकांना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण १ हजार ३०७ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी १ हजार १४२ तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील १६ अहवाल पॉजिटीव्ह आले असून उर्वरीत १ हजार १२६ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून १६५ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या ८५ रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी ५२ रुग्ण डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटलमध्ये, ३३ रुग्ण डेडिकेटेड कोवीड हेल्थ केअर सेंटरमध्ये दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी ४ हजार ९९६ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सहाव्या रुग्णाच्या संपर्कातील ४ व्यक्तींचे अहवाल प्रलंबीत असून इतर सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर सातव्या आणि आठव्या रुग्णाच्या संपर्कातील सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि. २ मे पासून आज अखेर एकूण ३६ हजार ६२८ व्यक्ती दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये खारेपाटण चेकपोस्ट येथून २६ हजार ९३५, फोंडा – १ हजार ९६३, करुळ – ३ हजार ३२०, आंबोली – १ हजार ५८७, बांदा – १ हजार ७४०, दोडामार्ग – ७८३ व्यक्तींनी जिल्ह्यात प्रवेश केला आहे.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.