Friday, May 1, 2020

जिल्ह्यात ४१२ व्यक्ती अलगीकरणात

सिंधुदुर्गनगरी– अभय जाधव

आजमितीस जिल्ह्यात एकूण ४१२ व्यक्ती अलगीकरणात आहेत. त्यापैकी २७२ व्यक्तींना घरीच अलगीकरण करण्यात आले असून १४० व्यक्ती या संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत एकूण ४०७ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या सर्व नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी ४०५ नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह आहा आहे. सध्या जिल्हा रुग्णालयाकडून पाठविण्यात आलेल्या एकाही नमुन्याचा अहवाल येणे शिल्लक नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये सध्या ३७ व्यक्ती दाखल असून त्यातील २६ व्यक्ती या डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटलमध्ये तर ११ व्यक्ती या डेडिकेटेड कोवीड हेल्थ सेंटरमध्ये दाखल आहेत. आज रोजी आरोग्य विभागामार्फत एकूण २३८३ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
नागरिकांसाठी ऑनलाईन ओपीडीची सुविधा
जिल्ह्यातील नागरिकांसाठी आरोग्य विभागाचे esanjeevaniopd.in हे ॲप तयार करण्यात आले आहे. आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करून ही वेबसाईट सुरू करता येते. या वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन ओपीडी, प्राथमिक उपचारविषयक मोफत मार्गदर्शन मिळणार आहे. सध्या या वेबसाईटचा लाभ जिल्ह्यातील १८३ व्यक्तींनी घेतला आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
घरीच अलगीकरण करण्यात आलेले २७२
संस्थात्मक अलगीकरणात असलेले १४०
पाठविण्यात आलेले एकूण नमुने ४०७
अहवाल प्राप्त झालेले नमुने ४०७
आतापर्यंत पॉजिटीव्ह आलेले नमुने २
निगेटीव्ह आलेले नमुने ४०५
अहवाल प्राप्त न झालेले नमुने ००
विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण ३७
सध्यस्थितीत जिल्ह्यातील पॉजिटीव्ह रुग्ण०१
आज रोजी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती २३८३

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.