सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात आज आणखी ८ पॉझिटिव्ह जणांचे कोवीड – १९ तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये कणकवली तालुक्यातील ६ जणांचा, वैभववाडी तालुक्यातील १ आणि मालवण तालुक्यातील एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली आहे.
कणकवली येथील ४ रुग्णांनी मुंबई येथून प्रवास केला आहे. तर दोन व्यक्तींनी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथून प्रवास केला आहे. मालवण तालुक्यातील रुग्ण हा ठाणे येथून आलेला आहे. वैभववाडी तालुक्यातील रुग्ण हा प्रभादेवी मुंबई येथून आलेला आहे. या नवीन ८ रुग्णांमध्ये ४ महिला व ४ पुरुषांचा समावेश आहे. या सर्वांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. ८ नवीन कोरोना बाधीत रुग्ण सापडल्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आता १६ झाली आहे. यातील ५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता ११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.