सिंधुदुर्गनगरी : अमोल जाधव
जिल्ह्यात आढळलेल्या सहाव्या कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कातील ५ व्यक्तींच्या नमुन्याचे तपासणी अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर आणखी ११ अहवाल प्रलंबित आहेत. तर सातव्या पेशंटच्या संपर्कातील १३ जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. ८ व्या रुग्णाच्या संपर्कातील ३ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून आणखी दोन जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. तर पाचव्या रुग्णाच्या संपर्कातील १७ व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.

जिल्ह्यात एकूण १ हजार १९४ व्यक्ती अलगीकरणात आहेत. त्या पैकी ८०७ व्यक्तींना गृह अलगीकरणात ठेवण्यात आले असून ३८३ व्यक्ती या संस्थात्मक अलगीकरणात आहेत. जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण १ हजार २०० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी ९९९ तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील ८ अहवाल पॉजिटीव्ह आले असून उर्वरीत ९९१ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून २०१ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात सध्या १०४ रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी ५५ रुग्ण डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटलमध्ये, ३६ रुग्ण डेडिकेटेड कोवीड हेल्थ केअर सेंटर मध्ये, १३ रुग्ण कोवीड केअर सेंटरमध्ये दाखल आहेत. आरोग्य यंत्रणेमार्फत आज रोजी ६ हजार ९९४ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात आढळलेल्या ८ कोरोना बाधीत रुग्णांपैकी ४ रुग्ण विलगीकरण कक्षामध्ये दाखल असून ४ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले आहेत.
परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज अखेर एकूण ३१ हजार ४८१ व्यक्ती दाखल झाल्या आहेत.
परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज अखेर एकूण ३१ हजार ४८१ व्यक्ती दाखल झाल्या आहेत.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.