Saturday, May 2, 2020

महाविद्यालयामध्ये ऑनलाईन सेमिनार स्तूत्य उपक्रम अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई

सावंतवाडी : राजेश जाधव

श्री. पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथील भूगोल व अर्थशास्त्र विभाग आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय ऑनलाईन राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
              “कोवीड १९ चा भारतीय, सामाजीक, आर्थिक क्षेत्रावरचा प्रभाव” या विषयावर या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे गृह व अर्थराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या भाषणाने झाले.
             आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी कोरोनाचा आपल्या भारतीय व पर्यायाने महाराष्ट्राच्या आर्थिक क्षेत्रावर फार मोठा परिणाम झाल्याचे नमुद करुन उद्योग,कृषी क्षेत्र पुर्णपणे ठप्प झाल्याचे सांगितले या येणाऱ्या आर्थिक संकटावरती मात करताना जे आराखडे किंवा नियोजन करायचे आहे त्याकरीता अशा परिषदांमध्ये जे विचारमंथन होईल ते फार महत्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी नमुद केले आहे.
             तत्पुर्वी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एल.भारमळ यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये परिषदेचे हेतू स्पष्ट केले परिषदेचे बीज भाषण मुंबई विद्यापिठाच्या मानव्यशास्त्र विभागाचे अधीष्ठाता डॉ.राजेश खरात यांनी केले त्यानंतरच्या सत्रामध्ये विक्रमगड कॉलेजचे प्राचार्य डॉ.हेमंत पेडणेकर व डॉ.राजेश चव्हाण यांचे मार्गदर्शन झाले.सदर परिषदेमध्ये देशभरातून ४१५ प्राध्यापक, संशोधक सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.