Special Report:-
टिम KONKAN मिरर:-
"हिंदु वा मुसलमान;शिख बौद्ध आहे,
अभिमान हा आम्हाला;तु भारतीय आहे "
तमिळनाडु मधील त्रिची मध्ये एका गर्भवती महिलेला प्रसूती कळा चालू झाल्या वर लॉकडाऊन मध्ये
ती कशीबशी सिविल हॉस्पिटल ला पोहचली.डॉक्टर नी सांगितले की आपरेशन करावे लागेल त्या साठी रक्ताची गरज लागेल.तिचा नवरा लोकडाऊन ची काळजी न करता रस्त्यावर फिरू लागला,अनेक ठिकाणी नकार घंटा मिळूनसुद्धा तो दुसरे ठिकाण शोधत राहतो.त्याला असा फिरताना पाहून एका पोलीस शिपाया ने त्याला थांबविले व कारण विचारले,कारण कळल्यावर पोलीस म्हणतो 'माझा हि ब्लड गृप तोच आहे, मी देतो रक्त दोघे हॉस्पिटल मध्ये जातात रक्तदान केले जाते. रक्त मिळाल्याने ऑपरेशन व्यवस्थित होते बाळ व बाळाची आई सुरक्षित आहे.हि बातमी कळल्यावर जिल्हा पोलीस प्रमुख त्या शिपाई ला १००० रु बक्षीस देतात
व राज्य पोलीस महासंचालक १००००० रु देतात. मात्र
२३ वर्षाचा तो पोलीस ते बक्षिसाचे पैसे त्या हॉस्पिटल मधील त्याच स्त्री ला देतो
त्या पोलीसाचे नाव आहे सैय्यद अबु ताहिर...
व त्या स्त्री चे नाव आहे सुलोचना...
परंतु आज संपूर्ण भारत देशाला दर्शन झाले ते "माणुसकीचे"
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.