Monday, April 27, 2020

"ने मजसी ने परत मातृभूमीला;"

"ने मजसी ने परत मातृभूमीला;"

"बाळा तुझ्यासाठी प्राण तळमळला..."

सावंतवाडी:- सुविधा वागळे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील हातावर पोट असलेल्या कुटुंबातील महिला गौरांगी केळुसकर या गोवा मधील जॉर्डन वेर्णा कंपनी मध्ये कार्यरत असून तीला एक वर्षाचा लहान मुलगा आहे. ती कंपनीतून लॉकडाऊन च्या आदींच्या काळात २ दिवसांनी घरून बाळाकडे येऊन जाऊन करायची पण आता १ महिना झाला तरी तिच्या बाळाला भेटता आले नाही. म्हणून तिच्या बाळाची तब्बेत गंभीर असल्यामुळे तीला पण धक्का लागला आहे. पण गोवा सरकार परवानगी देत नाही.तरी कृपया या महिलेला गोवा सरकाने परवानगी द्यावी त्यांनी जबाबदारी ने तिला पोच करावे जेणेकरून दोन जीव वाचतील अशी विनंती आंत राष्ट्रीय हिंदू परिषद मुंबई अध्यक्ष निलेश कुडतरकर तसेच कोकण मिरर ब्युरो चीफ असीम वागळे यांनी केली आहे. 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.