टिकाटिपणी करून मोठेपणं मिळवायची संजू परब यांची जुनी सवय....
निदान राज्यावर आलेल्या संकटाचे तरी नगराध्यक्षांनी ठेवावे भान.. काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी
सावंतवाडी:-सुविधा वागळे
खासदार विनायक राऊत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग चे खासदार असून त्याच्यावर या दोन्ही जिल्ह्याची जबाबदारी आहे. आणि एक खासदार म्हणून या दोन्ही जिल्ह्याची काळजी घेणे हे त्याचे कर्तव्य आहे. त्यामुळेच ते आपला जीव धोक्यात घालून ते या दोन्ही जिल्ह्याचा दौरा करत आहेत. आपली जबाबदारी समजून खासदार विनायक राऊत आणि पालकमंत्री उदय सामंत हे जिल्ह्याचा दौरा करत आहेत. जशी सावंतवाडीचे नगराध्यक्ष म्हणून तुम्ही सावंतवाडीतील प्रत्येक प्रभागात जाऊन लोकाची काळजी घेत आहात जे तुमचं कर्तव्य आहे ते पार पाडत आहात तसेच खासदार आणि पालकमंत्री आपले कर्तव्य पार पाडत आहेत. त्यामुळे या कठीण परिस्थितीत नको त्या गोष्टीचे राजकारण करू नये.
खासदार आणि पालकमंत्री मौज मजा करण्यासाठी दौरा करत नाही आहेत. त्यामुळे भाजप जिल्हा प्रवक्ते म्हणून अस बालिश पणाचे वक्तव्य करणे संजू परब यांना शोभत नाही. आणि जर अस असेलच तर नगराध्यक्ष संजू परब यांनीही तहसीलदार यांची परवानगी घेवून सावंतवाडीत फिरू नये.
खासदार आणि पालकमंत्री यांनी जिल्ह्यातील आपल्या जनतेसाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून काळजी घेत आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना, किंवा गोर गरीब जनतेला मदत म्हणून काम करणाऱ्या लोकावर, संस्थावर या कठीण परिस्थितीत तरी टिका करू नये असे मत कॉंग्रेसच्या महिला जिल्हाअध्यक्षा साक्षी वंजारी यांनी मांडले आहे. तसेच खासदार हे कोणत्याही पक्षाचे असले तरी त्याच्यावर टिका करणे हे कोणत्याही पक्षाच्या नेत्याला शोभत नाही असे ही त्यानी सांगितले आहे.
मुळात विरोधकांनी या कठीण काळातही खासदार विनायक राऊत आणि पालकमंत्री उदय सामंत हे करत असलेल्या कार्याचे कौतुक करणे होते गरजेचे असे ही मत त्यानी मांडले आहे.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.