Wednesday, April 22, 2020

दोडामार्ग तालुक्यात बीएसएनएल नेटवर्कचा "मिस्टर इंडिया"

दोडामार्ग तालुक्यात बीएसएनएल नेटवर्कचा "मिस्टर इंडिया".....

नेटवर्क लावतय स्वतःच्या मर्जीनेच हजेरी!!!!

दोडामार्ग:-सुविधा वागळे
साटेली भेडशी परीसरामध्ये गेले दोन दिवस बीएसएनएल नेटवर्क व्यावस्थित नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.लाँकडाऊनच्या काळात सर्वजण घरी बसुन असल्याने काहीजणांना "वर्क फ्रॉम होम" चा वापर करुन घरी बसुन काम कराव लागत. परंतु साटेली भेडशी परीसरामध्ये दोन दिवस व्यवस्थित नेटवर्क नसल्याने त्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार कल्पना देवुन सुद्धा संबंधित अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे.
साटेली भेडशी परीसरामध्ये गेल्या दोन दिवसापासून सकाळी नेटवर्क गेले की रात्री कधी पण नेटवर्क येत असल्याने परीसरामध्ये थ्रीजी सेवा गायब झाली आहे. त्यामुळे आँनलाईन पद्धतीने होणाऱ्या कामात मात्र दिरंगाई होत आहे.
साटेली भेडशी परीसरामध्ये गायब होणारे नेटवर्क लवकरात लवकर सुरळीत व्हावे अशी मागणी ग्रामस्थ करत आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.