Monday, April 20, 2020

घोटगे गावातील मूबंई स्थित बांधवांसाठी एकवटले गाव....

घोटगे गावातील मूबंई स्थित बांधवांसाठी एकवटले गाव....

चाकरमान्यांना विलगीकरण कक्षात ठेवण्याची जबाबदारी  ग्रामपंचायतीने स्विकारली...

सावंतवाडी:-असीम वागळे 
कोकणातील  घोटगे गावातील ग्रामपंचायतीने आपल्या  गावातील  मूबंई स्थित बांधवांसाठी  मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून आपल्या बांधवांना गावी पाठवून देण्यासाठी विनंती केली आहे. व त्यांची गावात विलगीकरण कक्षात ठेवण्याची जबाबदारी  ग्रामपंचायतीने स्विकारली आहे. घोटगे गावातील  ग्रामपंचायतीचे आणि गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे तसेच ग्रामस्थांचे सर्वच स्तरावर होतय कौतुक.अशा  प्रकारेच  बाकीच्या  ग्रामपंचायतीने सुध्दा अशी व्यवस्था करून  आपल्या बंधू आणि भगिनीना आणल्यास  फार बरे होईल. फक्त  परगावातून येणा-यानी सरकारी, व ग्रामपंचायतीच्या नियमांचे पालन  केले पाहिजे. नाही तर  गावातील  ग्रामस्थांना त्रास होईल. जर आपण वरिल  नियमांचे  पालन केल्यास मुबंई मधे सुध्दा  कोरोना लवकर आटोक्यात  येण्यास मदत होइल..

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.