Monday, April 20, 2020

भाजीच्या गाडीतून सांगलीला जाण्याच्या बेतात असलेले जोडपे ताब्यात..

भाजीच्या गाडीतून सांगलीला जाण्याच्या बेतात असलेले जोडपे ताब्यात..

वाहनचालकावर गुन्हा दाखल.....


सावंतवाडी:-असीम वागळे 
आज सावंतवाडी येथून आंबोली मार्गे सांगलीला भाजीच्या गाडीतून जाण्याचा बेत करणाऱ्या जोडप्याला आंबोली चेक पोस्टवर अडवून ताब्यात घेतले. गाडी चालकासह त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. चालकाला ताब्यात घेत वाहन जप्त करण्यात आले. संपूर्ण जग सध्या कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावामध्ये  त्रस्त असताना, अडचणीच्या ठिकाणी अडकलेला प्रत्येक इसम हा आपल्या घरी जाण्यासाठी नानातर्‍हेचे उद्योग करीत आहे.  असाच एक उद्योग आज सकाळी आंबोली  येथे करताना  एका जोडप्याला  आंबोली पोलिसांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आले. ही कारवाई आज आंबोली चेकपोस्टवर करण्यात आली. सायंकाळी साडेसात वाजता याबाबतची माहिती सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली. लॉकडाऊन कालावधी सुरू असताना प्रवास केल्यामुळे सदर जोडप्यासह वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.