Saturday, April 18, 2020

दाऊद आगांनी केले शेर्ले येथे धान्य वाटप

"ना खून का रिश्ता, नाही कोई धागा; बेसहारा मजुरांच्या मदतीला धावून आले दाऊद आगा"...

शेर्ले येथील मजुरांना केले दहा हजार रुपयांचे धान्य वाटप!!

बांदा:-असीम वागळे

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुमारे दहा-पंधरा दिवसांपूर्वी दहा-बारा परप्रांतीय मजुरांची टोळी शेर्ले गावात दाखल झाली. या मजुरांच्या म्हणण्यानुसार लॉक डाऊन झाल्यानंतर आपल्या गावी परत जाण्यासाठी हे पायी निघाले असता, बऱ्याच गावातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली परंतु शेर्ले गावातील ग्रामस्थांनी उदार अंतःकरण दाखवून त्यांना गावात आसरा दिला. त्यांची प्राथमिक तत्वावर अन्नपाण्याची व्यवस्था केली. यानंतर सदरची माहिती तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना देण्यात आली, तरी म्हात्रे यांनी त्वरित या मजुरांना अन्नधान्य पुरवठा केला. मात्र सदर बाब बांदा येथील रहिवासी व सामाजिक कार्यकर्ते दाऊद आगा यांना समजताच क्षणाचीही उसंत न घेता आपल्या पदरच्या १००००₹ चे
धान्य घेवून सदर मजुरांना वाटप केले. तरी यावेळी शेर्ले ग्रामपंचायत सदस्य फजल रखानगी तसेच तलाठी बोरकर, मतीन रखानगी व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. तरी दाउद आगा यांनी केलेल्या सहकार्याबद्दल तसेच तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या मदतीबद्दल सदर मजुरांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.