कोरोनाची नियमावली पाळत नवदांपत्याने घेतली सप्तपदी
सावंतवाडी:-असीम वागळे
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात लग्नसराईचा हंगाम संपत चालल्यामुळे इन्सुलितील एका नवविवाहित दाम्पत्याने शासनाच्या नियमांचे उल्लंघन होऊ न देता आज अनोख्या पद्धतीने आपला विवाह सोहळा पार पडला.विशेष म्हणजे या विवाह सोहळ्याला वधू-वरांच्या घरातील कोणीच उपस्थित नव्हते,तर फक्त नवरदेवाचा एक मित्र आणि भटजी मिळून अवघ्या चार जणांच्या उपस्थितीतच हा सोहळा संपन्न झाला,आणि या विवाहितांची वरात दुचाकीवरुनचं दारात आली.दरम्यान या लग्न सोहळ्यापूर्वी दोन्ही विवाहितांनी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची परवानगी घेतली होती.यावेळी शासनाच्या नियमांचे पालन केल्यास विवाहाला आपली काहीच हरकत नाही,असे श्री.म्हात्रे यांनी स्पष्ट केले होते. इन्सुली गावकर वाडी येथे राहणारा वर स्वप्निल दीपक नाईक व सातार्डा येथे राहणारी वधु रसिका मनोहर पेडणेकर यांचा दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने यापुर्वीच एप्रिल महिन्यात विवाह ठरला होता. परंतु भारत बंद आणि लॉकडाऊन च्या परिस्थितीमुळे सदर विवाह रखडला होता. त्यामुळे त्यांनी सदर विवाहासाठी तहसीलदार श्री राजाराम म्हात्रे यांच्याकडे कायदेशीर परवानगी मागितली होती. याबाबत तहसीलदार म्हात्रे म्हणाले की, शासनाने निर्धारित केलेल्या सर्व नियमांचे पालन करून फक्त पाच माणसांच्या उपस्थितीत सदर विवाह करण्यास हरकत नाही. तहसीलदारांच्या नियमांचे पालन करून चक्क वधू-वरांनी तोंडाला मास्क व सोशल डिस्टन्सींगचे पालन करून सदर विवाह संपन्न केला. तरी हा विवाह बांदा येथील महालक्ष्मी मंगल कार्यालयात भटजी प्रमोद वडेर यांनी वैदिक पद्धतीने पार पाडला. यावेळी वर पक्षा'तर्फे वराचा मित्र हेमंत वागळे यांनी मोलाची भूमिका पार पाडली. तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी केलेल्या सहकार्याबद्दल दोन्ही कुटुंबीयांकडून त्यांचे आभार मानले जात आहेत.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.