बेजबाबदार अधिकारी,शेतकरी वर्गाच्या नुकसानास कारणीभूत....
रोणापाल शेतकरी आक्रमक..... वीज अधिकाऱ्यांनी दिली घटनास्थळाला भेट!!!
बांदा:-सुविधा वागळे
रोणापाल मळी क्षेत्रात दोन दिवसांपूर्वी आग लागून तीन एकरावरील काजू व अन्य झाडे जळाली होती. सलग तिसऱ्या वर्षी याठिकाणी स्पार्किंगमुळे आग लागण्याची घटना घडली. नुकसान भरपाईची कागदपत्रे मुख्य कार्यालयात वेळेवर पोहचत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे असे सांगत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी बांदा वीज वितरणचे सहाय्यक अभियंता अनिल यादव यांना धारेवर धरले. तसेच अशा बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळेच काजू बागायतींचे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
जिल्हा प्रभारी सहायक विद्युत निरीक्षक दुर्गेश सबनीस यांनी सदर घटनेची दखल घेऊन पाहणी केली. यावेळी रोणापाल सरपंच सुरेश गावडे, उपसरपंच पप्या केणी, माजी सरपंच उदय देऊलकर, निगुडे तलाठी नारायण घृणात, कृषी अधिकारी यशवंत सावंत, नुकसानग्रस्त शेतकरी कृष्णा केणी, प्रकाश गावडे, प्रकाश शेगडे (अन्य भागदार), वायरमन नारायण मयेकर उपस्थित होते. सोशल डिस्टन्सिंगचे अंतर पाळण्यात आले.
शेतकरी कृष्णा केणी यांच्या बागेला २०१८ साली आग लागली होती. कागदपत्रांची पुर्तता करूनही अद्याप त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. काजू कलमे जळाल्याने बागायतीसाठी घेतलेले कर्ज कसे फेडायचे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा असा सवाल त्यांनी अधिकाऱ्यांना केला.
पंचनामा फक्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यापुरताच केला जातो. भरपाई कोणी दिली आणि कोणी घेतली अशाप्रकारे वीज अधिकारी गाफिल राहतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या भावनांशी न खेळता जबाबदारीने काम पार पाडावे, असे नुकसानग्रस्त शेतकरी प्रकाश गावडे म्हणाले. तर आग लागून दोन दिवस न होताच काल रात्रो त्याच ठिकाणी वाहिन्यांचा एकमेकांना स्पर्श होऊन स्पार्क झाले. वीज अधिकाऱ्यांनी सर्व लाईनचा सर्वे करून कमकुवत झाल्या तारा बदलाव्यात. तसेच शेतकऱ्यांच्या बागायती वाचविण्याचे आवाहन माजी सरपंच उदय देऊलकर यांनी केले.
शेतकऱ्यांनी प्रश्नांचा भडीमार केल्यानंतर अनिल यादव म्हणाले, सर्व प्रकरणे मंजुरीसाठी मुख्य कार्यालयात पाठविली आहेत. परंतु त्याच ठिकाणी असलेले जिल्हा प्रभारी सहायक विद्युत निरीक्षक दुर्गेश सबनीस यांनी आपल्याजवळ अजून एकही प्रकरण आले नसल्याचे सांगितले. त्यामुळे वीज विभागातच सावळागोंधळ असल्याचे सरपंच सुरेश गावडे यांनी सांगितले.
रोणापालमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागलेल्या चारही प्रकरणांच्या कागदपत्रांची पूर्तता आठ दिवसांत करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य भरपाई देण्यात येणार असून यापुढे सर्वती सतर्कता बाळगण्यात येणार असल्याचे, सहायक अभियंता अनिल यादव यांनी शेतकऱ्यांना सांगितले.
तसेच शेतकऱ्यांकडून कागदपत्रे वेळेवर घेतली जातात. परंतु ती प्रकरणे मुख्य कार्यालयापर्यंत पोहच नसल्याने दोन तीन वर्षे तशीच पडून राहतात. अन् शेतकरी स्थानिक लोकप्रतिनिधींना याचा जाब विचारतात. त्यामुळे बेजबाबदार अधिकाऱ्यांमुळे लोकप्रतिनिधींची बदनामी होत असल्याचे खडे बोल, सरपंच सुरेश गावडे यांनी सहायक अभियंता अनिल यादव यांना सुनावले.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.