Tuesday, April 28, 2020

कोंकण मिरर.. २९ एप्रिल २०२०

अखेर "त्या" आठ जणांचा जामीन मंजूर....

गेले होते शिकारीला,पण झाली त्यांचीच शिकार....
कणकवली:-प्रसाद नाईक
भिरवंडे येथे जंगलात शिकारीच्या उद्देशाने बंदूक घेऊन गेलेल्या आठ जणांना आज जामिनावर मुक्तता करण्यात आले त्यांना सोमवारी कणकवली पोलिसांनी अटक केली होती त्यांच्यावर हत्यार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

भिरवंडे , मुरडवेवाडी येथील अरविंद महादेव सावंत ( वय ६५ ) , बद्रीनाथ गणपत सावंत ( वय ५७ ) , पुरूषोत्तम वसंत सावंत ( वय ५६ ) , दत्तात्रय सदानंद सावंत ( वय ५४ ) , दिगंबर राजाराम सावंत ( वय ४८) , जगदीश नामदेव सावंत ( वय ५५ ) , राजेंद्र गणपत टिळवे ( वय ५४ ) आणि आनंद रामकृष्ण सावंत ( वय ५० ) यांचा समावेश होता. त्यांच्याकडून ७००० रुपये किमतीची सिंगल बॅरल व १०००० रुपये किमतीची डबल बॅरल अशा गावठी बनावटीच्या दोन बंदुका आणि ४०० रुपये किमतीची चार काडतूसेही जप्त करण्यात आली होती. त्यातील एक बंदूक परवाना असलेली तर एक बिगरपरवाना असलेली होती.

जिल्ह्यात संचारबंदी सुरू असतानाही बेकायदेशीरपणे हे सर्व बंदूक घेऊन शिकारीला गेल्याचे पोलिसांना समजले होते . त्यामुळे या सर्वांना जंगलमय भागातून स्थानिक गुन्हा अन्वेषण पथक व कणकवली पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले होते. त्यांच्यावर जमावबंदी आदेशाचा भंग केल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व संशयिताना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.