मुंबई मनपात "आंधळं दळतंय; कुत्र पीठ खातय" -आमदार नितेश राणे
नाईलाजाने पाचारण करावे लागेल लष्कराला!!!
टिम:- KONKAN मिरर
भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून लष्कराला बोलावणं हा एकमेक पर्याय असल्याचं म्हटलं आहे. महापालिकेत खूप गोंधळ उडाला असून जर काहीच बदललं नाही तर गोष्टी हाताबाहेर निघून जातील अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. एकमेकांवर होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागत असल्याचंही ते म्हणाले आहेत.
नितेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “मुंबई महापालिकेत खूप गोंधळ आहे. जर काही बदल झाले नाही तर मुंबईतील परिस्थिती हाताबाहेर निघून जाईल. खरी आकडेवारी जाहीर करण्यात आलेली नाही. जी आकडेवारी दाखवली जात आहे त्यापेक्षा ही संख्या खूप मोठी आहे”. नितेश राणे यांनी लवकरच नवे महापालिका आयुक्त निवडले जाणार का ? असा प्रश्नही विचारला आहे.
पुढे ते म्हणाले आहेत की, “आरोप-प्रत्यारोपांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला पाचारण करणे हा एकमेव पर्याय आहे”.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.