Monday, April 20, 2020

स्टार ग्रुप" ची अशीही आत्मीयता...

"स्टार ग्रुप" ची अशीही आत्मीयता...


सावंतवाडी तलावातील माशांना केले खाद्य वाटप!!!

सावंतवाडी:-संजोग जाधव 
  कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आज संपूर्ण भारत लॉक डाऊन मध्ये असल्याने समाजातील गरजवंत नागरिकांना बऱ्याच सेवाभावी संस्था तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून मदत मिळत आहे.परंतू संचारबंदी मुळे सावंतवाडी मोती तलावाच्या काठावर फेरफटका मारण्यास येणाऱ्यांची संख्या मात्र अगदी तुरळक झालेली आहे. त्यामुळे सावंतवाडीतील नागरिकांप्रमाणेच सावंतवाडी मोती तलावातील मासे देखील लॉक डाऊन चा थरार अनुभवत आहेत. परिणामी त्यांना मिळणाऱ्या खाद्यपदार्थावर ह्याचा परिणाम दिसत आहे. परंतु "स्टार ग्रुप" सावंतवाडी यांनी या माशांची दखल घेत आज संपूर्ण सावंतवाडी मोती तलाव परिसराला फेरफटका मारून खाऊचा आस्वाद दिला. यातून मात्र माठेवाडा येथील स्टार ग्रुपने जलचर जीवाविषयी असलेली आत्मीयता दाखवून दिली.

त्यांनी लॉकडाऊन काळात हा एक वेगळा आगळा उपक्रम राबविला. यात स्टार ग्रुप माठेवाडाचे पदाधिकारी विशाल पवार, कुणाल सावंत व योगेश नाईक आदी उपस्थित होते.
हा उपक्रम राबवण्यापूर्वी त्यांनी येथील पालिकेचे आरोग्य कर्मचारी दीपक म्हापसेकर यांना कल्पना दिली होती. संपूर्ण राज्यात कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर शहरातील मानबिंदू असलेला मोती तलावाचा काठ निर्मनुष्य झाला होता. पूर्वी काठावर बसलेले लोक आवडीने या माशांना खाद्य यांना टाकत असत. मात्र लॉक डाऊन काळात मोती तलावावर कोणीही व्यक्ती नसल्याने या माशांना गेले बरेच दिवस नागरिकांकडून खाद्य यांना मिळाले नाही.

तसेच या काळात जीवनावश्यक वस्तू व अन्नासाठी काही नागरिकांची व इतर प्राण्यांची परवड होत होती. या काळात नागरिकांना विविध नियमाद्वारे जीवनावश्यक वस्तू व धान्य मिळण्यासाठी हालचाल सुरू होती. तसेच काही सेवाभावी सामाजिक संस्थांकडून मदतही करण्यात येत होती. तर भटक्या प्राण्यांना नागरिकांनी अन्न दिले होते. अशा स्थितीत मोती तलावातील असलेले जलचर मासे दुर्लक्षित राहिले होते. याचा विचार करून स्टार ग्रुप माठेवाडा  यांनी काल सायंकाळी मोती तलाव काठावर दाखल होत माश्याना  चूरमुले व इतर खाद्य दिले. हे खाद्य त्याने एकाच ठिकाणी मोती तलावात न टाकता संपूर्ण मोती तलाव काठाभोवती तलावात टाकले.या ग्रुपची जलचर प्राण्यांविषयी असलेली आत्मीयता यातून दिसून आली. त्यांच्या उपक्रमाबद्दल या ग्रुपचे कौतुक करणे येत आहे. या ग्रुपकडून संपूर्ण लॉकडाऊन काळात ड्युटीवर तैनात असलेल्या सर्व क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना अल्पोपहारही दिला होता.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.