प्रतिनिधी : कृष्णा तुळसकर
जिल्हा सामान्य रुग्णालयातील उपहार गृहामध्ये शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते यांनी दिली आहे. सुरभी सुशिक्षीत बेरोजगार विविध सेवा सहकारी संस्था यांच्याकडे हे केंद्र चालवण्यासाठी देण्यात आले आहे.
जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी १५० थाळी मंजूर करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा मुख्यालयात जिल्हा परिषदेच्या १५० थाळींची सोय असणारी दोन शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आली आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातही शिवभोजन केंद्र सरु करण्याविषयी विचार झाला होता. तथापी तेथील उपहार गृहाची दुरुस्ती करणे गरजेचे होते. आता ही दुरुस्ती करण्यात आली असून त्याठिकाणी ५० थाळी पुरवठा करणारे शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले आहेत.
कोरोना विषाणूमुळे संपूर्ण देशात ताळेबंदी आहे. अशावेळी स्थलांतरित, बेघर, मजूर यांच्यासाठी शिवभोजन केंद्र हे वरदान ठरत आहे. तसेच सर्व शिवभोजन केंद्रांच्या ठिकाणी दिनांक २९ मार्च रोजीपासून शिवभोजन थाळी ही ५ रुपये या नाममात्र दराने उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी दादासाहेब गिते यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.