Monday, April 27, 2020

जिल्हा प्रशासनाकडून ऑनलाईन उपचारविषयक मोफत मार्गदर्शन

विशेष प्रतिनिधी : अभय जाधव



जिल्ह्यात आजमितीस २८१ जण अलगीकरणात आहेत. त्यापैकी १८३ जणांना घरीच अलगीकरणात ठेवण्यात आले असून ९८ जण संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
          जिल्हा सामान्य रुग्णालयाने आतापर्यंत एकूण २८७ नमुने तपासणीसाठी पाठविले आहे. त्यातील २७४ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून १३ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये सध्या ५१ रुग्ण दाखल आहेत. तर आरोग्य यंत्रणेमार्फत आज एकूण ९३१ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
          विलगीकरण व अलगीकरणात असलेल्या व्यक्ती आणि जिल्ह्यातील नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करून घ्यावे तसेच esanjeevaniopd.in या वेबसाईटचा वापर करून ऑनलाईन ओपीडी, प्राथमिक उपचारविषयक मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
          कापडी मास्क दररोज स्वच्छ धुवून वापरावेत. तसेच कापडी मास्क व्यतिरिक्त इतर वापरलेले मास्कची विल्हेवाट बंद कचरापेटीत करावी. असे मास्क रस्त्यावर किंवा इतरत्र फेकू नयेत. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये, असे निदर्शनास आल्यास संबंधितांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

घरीच अलगीकरण करण्यात आलेले - १८३
संस्थात्मक अलगीकरणात असलेले - ९८
पाठविण्यात आलेले एकूण नमुने - २८७
अहवाल प्राप्त झालेले नमुने - २७४
आतापर्यंत पॉजिटीव्ह आलेले नमुने - १
निगेटीव्ह आलेले नमुने - २७३
अहवाल प्राप्त न झालेले नमुने - १३
विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण - ५१
सध्यस्थितीत जिल्ह्यातील पॉजिटीव्ह रुग्ण - ००
आज रोजी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती - ९३१

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.