Thursday, April 30, 2020

जिल्ह्यात ३४४ व्यक्ती अलगीकरणात

सिंधुदुर्गनगरी : अभय जाधव

          आजमितीस जिल्ह्यात एकूण ३४४ व्यक्ती अलगीकरणात आहेत. त्यापैकी २२४ व्यक्तींना घरीच अलगीकरण करण्यात आले असून १२० व्यक्ती या संस्थात्मक अलगीकरणात आहेत.
           जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत एकूण ३७५ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून ३४७ नमुन्यांचा तपासणी आहवाल प्राप्त झाला आहे. त्यापैकी ३४५ नमुन्यांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तर अजून २८ नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झालेला नाही. जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षामध्ये सध्या ७२ व्यक्ती दाखल असून त्यातील ३४ व्यक्ती या डेडिकेटेड कोवीड हॉस्पिटलमध्ये तर ३८ व्यक्ती या डेडिकेटेड कोवीड हेल्थ सेंटरमध्ये दाखल आहेत. आज रोजी आरोग्य विभागामार्फत एकूण २७२७ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.
घरीच अलगीकरण करण्यात आलेले २२४
संस्थात्मक अलगीकरणात असलेले १२०
पाठविण्यात आलेले एकूण नमुने ३७५
अहवाल प्राप्त झालेले नमुने ३४७
आतापर्यंत पॉजिटीव्ह आलेले नमुने २
निगेटीव्ह आलेले नमुने ३४५
अहवाल प्राप्त न झालेले नमुने २८
विलगीकरण कक्षात दाखल रुग्ण ७२
सध्यस्थितीत जिल्ह्यातील पॉजिटीव्ह रुग्ण ०१
आज रोजी तपासणी करण्यात आलेल्या व्यक्ती २७२७

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.