विशेष प्रतिनिधी : राजेश जाधव
जिल्ह्यातील उद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून परवानगी देण्यात येत आहे. अशा प्रकारची परवानगी मिळविण्यासाठी उद्योजकांनी permission.midcindia.org या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावेत असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
सदर संकेतस्थळावर अर्ज भरल्यानंतर त्यासोबतच उद्योगामध्ये काम करणाऱ्या सर्व कामगारांचे आधार कार्ड जोडावे. वाहनाने कामगारांची वाहतूक करण्यात येणार असल्याचे वाहन क्रमांकही जोडावा. तसेच जर उद्योगाच्या ठिकाणी कामगारांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येत असेल तर त्यासाठी स्वयंघोषणापत्राचा पर्याय आपोआप तयार होईल ते भरावे.
सध्या कुडाळ एमआयडीसी परिसरातील उद्योगांनी परवानगी साठी अर्ज केला आहे. त्यापैकी ५० उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. तर ८४ पैकी फक्त ११ प्रलंबित आहेत व इतर सर्व ठिकाणी कामगारांची राहण्याची सोय करण्यात आली असल्यामुळे त्यांना वेगळ्या परवानगीची आवश्यकता भासणार नसल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी सांगितले. तरी जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या उद्योजकांनीही त्यांचे उद्योग सुरू करावेत व त्यासाठी अर्ज करावेत असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.