सिंधुदुर्गनगरी:-अभय जाधव
शैक्षणिक वर्ष अखेरीस ४ मे ते १४ जून दरम्यान सुट्टी कालावधी राहणार आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक हे महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून नोकरीसाठी आपल्या जिल्ह्यात असतात. मात्र त्यांची कुटुंबे त्यांच्या मूळ गावी असतात. उन्हाळी सुट्टी कालावधीत ते आपल्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आपल्या जिल्ह्यात जातात. या अनुषंगाने अशा शिक्षकांना आपल्या कुटुंबियांना भेटता यावे यासाठी गावी जाण्यास परवानगी देण्याबाबत संबंधितांना पत्रव्यवहार करावा. अशी मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष के.टी. चव्हाण यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.