ॲड. मनिष सातार्डेकर यांच्यागाडीने घेतला अचानक पेट..
वेंगुर्ले:-कृष्णा तुळसकर
वेंगुर्ले शहरातील ॲड. मनिष सातार्डेकर यांच्या झेन या गाडीच्या पुढील बाजूस अचानक आगीने पेट घेतला. वेळीच आजू बाजूच्या नागरिकांनी धाव घेत आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातामध्ये गाडीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे.
ॲड. सातार्डेकर हे आपल्या घरा शेजारी आपली झेन ईस्टीलो गाडी पार्क करून ठेवतात. तशी ती गाडी पार्क करून ठेवलेली होती. दरम्यान दुपारच्या वेळी सातार्डेकर यांचे भाडोत्री यांनी गाडीमधून जळल्याचा वास येत असल्याने गाडीकडे जाउन बघीतल. तर त्यावेळी गाडीच्या बाॅनेट मधुन धुर येत होता. त्यानी तात्काळ सातार्डेकर यांना फोन केला त्यामुळे सातार्डेकर तत्काळ तेथे आले असता त्यांना गाडीच्या बाॅनेटच्या इथे आग लागलेली दिसली.
त्यांनी तात्काळ आपल्या जवळील पाण्याच्या पंपाने आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आग आटोक्यात आली. तोपर्यंत वेंगुर्ले नगरपरिषदेचा अग्निशमन बंब देखील आला आणि आग पुर्ण पणे विझवली परंतु गाडीचे खुप मोठे नुकसान झाले. साधारण एक लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. आग विझवण्यासाठी स्थानिक रहिवाशांनी व वेंगुर्ला नगरपरिषद यानी वेळीच सहकार्य केले त्यामुळे एक मोठा अनर्थ टळला असून आपण त्यांचे आभारी असल्याचे सातार्डेकर यांनी सांगितले. शॉर्ट सर्किट मुळे आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.