Friday, April 17, 2020

"फ्रि होम मेडिसीन डिलीव्हरी" आता माणगाव खो-यात.....

"फ्रि होम मेडिसीन डिलीव्हरी" आता माणगाव
खो-यात..... 


युवासेनेची संकल्पना....मोजावे लागणार फक्त औषधांचे पैसे !!!!!

कुडाळ:-संजोग जाधव
संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा लॉकडाऊन असल्याने अति दुर्गम भागात वैद्यकीय सेवा मिळू शकत नाही.याच पार्श्वभूमीवर युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या संकल्पनेतून आणि युवासेना माजी उपतालुकाप्रमुख सिद्धेश येळेकर,उपजिल्हाप्रमुख योगेश धुरी,कौशल जोशी,गौरेश कारेकर,सुमित आडेलकर,रमेश हळदणकर,कुणाल इब्रामपूरकर यांच्या सहकार्याने माणगाव खोऱ्यातील गर्भवती महिला,ज्येष्ठ नागरिक,नवजात बालक यांची औषधें घरपोच देण्याची सेवा राबविण्यात येणार आहे.
आपल्याला हवी असलेली औषधांची पावती ९४०३२२८४९७ या नंबर वर पाठवायची आहे.औषधें घरपोच दिली जातील. या सेवेत केवळ औषधांचे पैसेच घेतले जातील,घरपोच सेवेचे कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही अशी माहिती युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी देतानाच या औषधांबरोबर युवासेना सिंधुदुर्गतर्फे मास्क वाटप करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.