विशेष प्रतिनिधी:-उमेश होडावडेकर
सहजयोग ध्यान केल्यामुळे एकाग्रता वाढल्याने चिंता नैराश्यातून बाहेर पडून अलौकिक बळ प्राप्त होते. मानसिक शारीरिक स्वास्थ वाढीस लागते. याविषयीची सेवा देण्यासाठी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधता येतो. संपूर्ण जग सध्या कोरोनाव्हायरस या महामारी मुळे त्रस्त झाले आहे. विज्ञानवादी देश उदा. अमेरिका, चीन, इटली, स्पेन आदी आधुनिकतेकडे वाटचाल करणारे देश, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लयास पोचली आहेत. कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी भारत सरकारने लॉगडाऊन पुकारला, त्याला जनतेने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. मात्र लॉगडाऊनच्या काळात एकटेपणा दूर होण्यासाठी, त्या आपत्कालीन परिस्थितीत जीवनात नवीन मार्ग प्रदान करणारा सहज योग ध्यानधारणाचा मार्ग ऑनलाइन माध्यमातून घराघरात पोहचवण्याचे कार्य सहज योग च्या माध्यमातून करण्यात येत आहे. नवीन साधकांना या माध्यमातून मार्गदर्शन करीत आहेत. प्रशासनाच्या नियमाप्रमाणे सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून सदर उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यासह अनेक ठिकाणी राबविण्यात येत आहे. ध्यानधारणा व सामूहिक प्रार्थनेच्या माध्यमातून निर्माण होणारे सकारात्मक चैतन्य वाढविण्याकरिता सहजयोग प्रयत्न करीत आहे. सहजयोग यांचा टोल फ्री क्रमांक १८००३०७००८०० आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साधकांशी संपर्क साधण्याकरिता ९४२३३०३४२५, ९४२१९२२६६५, ९४२१२६७५८२ सदर क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सहजयोग मार्फत करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.