🔥योद्धा तू कोरोनाचा; पाईक साऱ्या रूग्णांचा..🔥
🚑या आरोग्य कर्मचाऱ्याने वाहून घेतले स्वतःला कोरोनाग्रस्तांसाठी...🚑
✍विशेष प्रतिनिधी:- मुंबई
_मुंबई महानगरपालिकेमध्ये ओशिवरा याठिकाणी आरोग्य विभागात सेवेत असलेले हे कर्मचारी "कोविड योद्धा" म्हणजे संजय चंद्रकांत खानविलकर होय. मुंबईत वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच प्रशासन आणि आरोग्य खाते यांच्यावर होणारा कामाचा भडिमार याचा विचार करून हा योद्धा, आपले कुटुंब, वैयक्तिक जीवन यांना दूर लोटत रात्रंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांची अविरत सेवा करीत आहे. आंतरराष्ट्रीय विश्व हिंदू परिषदेचे मुंबई अध्यक्ष निलेश कुडतरकर यांचे हितचिंतक तसेच ज्येष्ठ समाजसेवक सुधिर खानविलकर उर्फ डॅडी यांचे भाऊ म्हणून जनमानसात आपली ओळख निर्माण करणारा हा योद्धा आज मात्र "कोरोनाग्रस्तांचा कैवारी" म्हणून आपली छाप सोडीत आहे. सुरक्षा आणि काळजीपोटी कुडतरकर यांनी या योद्ध्याला स्वतःला जपण्याच्या सूचना दिल्या तेव्हा या योद्ध्याचे प्रत्युत्तर मात्र सर्वांनाच निरुत्तर करणारे होते; अगदी प्रांजळ मनाने हा योद्धा म्हणाला की, "मी माझं कर्तव्य निभावत आहे, रुग्णही माझ्या घरचे सदस्य आहेत, त्यामुळे त्यांना कुटुंबीयांसारखेच जपणार." खरोखरच आज भारत देशात या संकटाच्या पार्श्वभूमीवर जे डॉक्टर,परिचारिका, आरोग्य कर्मचारी आपल्या जीवाची बाजी लावून लढा देत आहेत, याच मुळे आज आपल्याला सुरक्षा प्राप्त होत आहे, म्हणूनच "अशा योद्ध्याप्रति आपण आपले दोन्ही कर मस्तकास जोडून विनम्रपणे कृतज्ञता व्यक्त करतो" असे भावनिक मत निलेश कुडतरकर यांनी आमच्याशी बोलताना मांडले._

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.