Wednesday, April 29, 2020

अण्णासाहेब पाटील महामंडळाच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत

सिंधुदुर्गनगरी : कोरोना विषाणूच्या निर्मुलनासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यावतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ८२ हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष संजय पवार व व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व जिल्हा समन्वयक आणि महामंडळाचे कर्मचारी यांनी हा निधी जमा केला आहे.
          सर्व जिल्ह्यातील समन्वयक आणि मुख्यालयातील कर्मचारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्याचा निर्णय घेत तो पुर्णत्वास नेला. महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन व्यवसाय सुरू केलेल्या लाभार्थ्यांकडूनही मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत करण्यात येत आहे.
          कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सर्व उद्योग बंद आहेत, त्यामुळे आर्थिक संकट ओढवले आहे. बेरोजगार, गरजू लोकांना मदत करणे व सामाजिक बंधिलकी जपणे यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत केल्याचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.