Wednesday, April 22, 2020

केशरी शिधापत्रिका धारकांना २४ पासून धान्य वाटप सुरू

सिंधुदुर्गनगरी : पवन मेहत्तर

 राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व शेतकरी योजनेमध्ये समावेश नसलेल्या १ लाख रुपयांपर्यंत कौटुंबिक उत्पन्न असलेल्या जिल्ह्यातील ३५ हजार ४०६ केशरी शिधापत्रिका धारकांना दिनांक २४ एप्रिल रोजीपासून रास्त भाव धान्य दुकांनांच्या माध्यमातून धान्याचे वितरण करण्यात येणार आहे. त्यामध्ये ८ रुपये प्रति किलो दराने ३ किलो गहू व १२ रुपये प्रति किलो प्रमाणे २ किलो तांदूळ  असे एकूण ५ किलो धान्य वाटप करण्यात येणार आहे. मे व जून महिन्यांमध्ये हे धान्य मिळणार आहे. यामध्ये एकूण १ लाख २५ हजार १७१ लाभार्थ्यांना या धान्य वाटपाचा फायदा मिळणार आहे. तरी जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिका धारकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन, जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.