विशेष प्रतिनिधी : कृष्णा तुळसकर
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणी कामकाज दिनांक ३ मे रोजी पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. यापूर्वी सदर दस्त नोंदणी दिनांक ३१ मार्च रोजीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. पण, जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग परसण्याची शक्यता लक्षात घेता आता सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणी ३ मे रोजीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.