Tuesday, April 14, 2020

नीलेश कुडतरकर यांचेकडून मुख्यमंत्र्याना साकडे...


कोरोनच्या पार्श्वभूमीवर विवीध मागण्यांसाठी निलेश कुडतरकर यांचेकडून मुख्यमंत्र्याना साकडे...

विश्वहिंदू परिषदेचे मुंबईप्रदेश अध्यक्ष निलेश कुडतरकर..

निल फाऊंडेशन अध्यक्ष तसेच समाजसेवक अशी आहे "दादांची " प्रचिती !!!!


टिम KONKAN मिरर:-


मुंबई हे ठिकाण अतिशय गर्दीचे आहे येथे एकाला कोरोनाव्हायरस ची लागण झाली तर ती हजारो लोकांपर्यंत पोहोचेल. मुंबईमध्ये संपूर्ण महाराष्ट्र आणि परराज्यातून लोक आले आहेत या आजाराला आळा घालायचा असेल तर गर्दी कमी करणे हाच उपाय आहे.
मुंबई शहरातून लोकांना बाहेर काढण्याकरिता रेल्वे सुरू करण्यात यावी चार दिवसात पन्नास टक्के मुंबई खाली होईल झोपडपट्टी रहिवाशी सार्वजनिक शौचालय वापरतात तसेच काही ना काही घेण्याकरिता घराबाहेर जावे लागते मुंबई मध्ये वास्तव्य करत असलेले नागरिक बिल्डींग मधील असो किंवा झोपडपट्टीमधील त्या लहान घरांमध्ये आठ ते दहा लोक राहतात अशा लहान घरांमध्ये चार फुटाचे अंतर ठेवून ते कसे राहतील तसेच त्यांना सर्व जीवनावश्यक वस्तू घरपोच पुरवणे सोपे नाही याकरिता आपण लवकरात लवकर मुंबईमधून संपूर्ण महाराष्ट्र व परराज्यातून चार दिवस रेल्वे चालू करण्यात यावी

तसेच कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारच्या मदतीकरिता जे कोणी निवृत्त सैनिक (मेडिकल कोवर) निवृत्त-प्रशिक्षित बेरोजगार परिचारिका (नर्स) वॉर्ड बॉईज यांना आव्हान केले आहे की महाराष्ट्राला तुमची गरज आहे त्यांना त्यांचा मोबदला प्रति दिवस ठरवून रोजच्या रोज देण्यात येऊन त्यांच्या प्रवासाकरीता वाहनाची सोय करावी.

तसेच भाजी मंडई-मार्केट आठवड्यामध्ये फक्त दोन दिवस सकाळी दहा ते चार वाजेपर्यंत चालू ठेवावेत. तसेच रेशनवरील पुरवठा मुंबईमध्ये वास्तव्य करीत असलेल्या नागरिकांना सर्व नागरिकांना त्याच्या वास्तव्याचा पुरावा रेशनिंग कार्ड कोणत्याही प्रकारचे असो-मतदान कार्ड-आधार कार्ड-गॅस बुक-बँक खाते-ड्रायव्हिंग परवाना-जन्म प्रमाणपत्र-विमा पॉलिसी-इतर कोणताही एक पुरावा असेल त्यांना प्रत्येकाला पुरवठा देणे गरजेचे आहे.

तसेच पुरवठा मध्ये गहू, तांदूळ, तूर डाळ, चणाडाळ, पामतेल, साखर व सर्व प्रकारचे कडधान्य, मीठ, डेटॉल, साबण तसेच घराच्या आजूबाजूला कीटक नाशक औषध मारण्यासाठी औषधे या वस्तू रेशन दुकानांमध्ये वास्तव्य करत असलेल्या सर्व नागरिकांकरिता वेळेवर तात्काळ पोहोचल्या पाहिजेत.

तसेच सर्व रेशनिंग दुकानांमध्ये जे काही नागरिकांना मोफत किंवा विकत काय दराने असा जो काही शासकीय जीआर ची प्रत रेशनिंग दुकानाबाहेर नागरिकांच्या माहितीकरिता लावण्यास दुकान दारांना आदेश देण्यात यावे.

प्रत्येक व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये कमीत कमी प्रति महिना तीन हजार रुपये जमा करायला हवे. प्रत्येक रेशनिंग दुकानांमध्ये प्रत्येक व्यक्तींना मास्क फ्री-मोफत देण्याचे आयोजन केले पाहिजे.तसेच हॉस्पिटलची कमतरता पडू नये याकरिता काही मैदाने आहेत तसेच मुंबई बाहेर जाण्याचे हायवे मार्गावर काही मोकळ्या जागा आहेत अशा ठिकाणी तंबू ठोकून मंडप उभारून त्याठिकाणी रुग्णांकरिता उपलब्ध करून त्यांचा इलाज करण्यात यावा.

तसेच नागरिकांची सेवेकरिता रस्त्यावर आपल्या जीवाची पर्वा न करता उतरलेले शासकीय कर्मचारी किंवा सरकारच्या मदतीला वेळेवर आलेल्या व्यक्तीस कोरोनाव्हायरस मुळे मृत्युमुखी झाल्यास त्यांच्या कुटुंबांना 50 लाख रुपये मंजूर करून देण्यात यावे.

हे सर्व जाहीर करून उपलब्ध केल्यानंतर कोणी विनाकारण रस्त्यावर खेळताना दिसेल त्यांना कमीत कमी दहा दिवस कारावास मध्ये टाका व दहा हजार रुपये दंड आकारण्यात यावा अशी सजा दिल्यावर सर्व न्युजवर,मीडियावर, व्हिडीओ, फोटो, व व्हाट्सअप वर नाव पत्ता फोटो सहित प्रसिद्धी केल्यानंतर कोणीही एकही व्यक्ती बाहेर निघणार नाही.
अशाप्रकारच्या विवीध जनहिताच्या मागणी बाबतचे विनंती निवेदन पत्र निलेश कुडतरकर यांनी नुकतेच मुख्यमंत्री महोदयांना सादर केले.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.