विनामूल्य "कमळ थाळीचा" आज होणार शुभारंभ-आ.नितेश राणे ....
कणकवली नगरपंचायतीच्या साहाय्याने राबवणार उपक्रम!!!
कणकवली:-असीम वागळे
देशात लॉक डाऊन जाहीर केल्यानंतर अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळेच उद्या पासून कणकवली शहरात कणकवली नगरपंचायतच्या सहकार्याने राणे कुटुंबीय रोज १५० लोकांसाठी "कमळ थाळी" सुरू करणार असल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी ट्विट द्वारे दिली आहे. तसेच ही थाळी विनामुल्य असणार आहे. त्यामुळे गरीब जनतेला या थाळीची नक्कीच मदत होणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.तसेच या थाळीमध्ये २ मुद भात,२ चपाती,१ वरण/डाळ (आमटी),१ भाजी असे पदार्थ असणार आहेत. विद्यानगर येथील लक्ष्मी विष्णु हॉल (संजीवनी हॉस्पिटलजवळ) या थाळीचा आस्वाद घेता येणार असून दुपारी १२ पासून २ पर्यंत ही थाळी उपलब्ध होणार आहे. असेही नितेश राणे यांनी आपल्या ट्विटद्वारे सांगितले आहे. तरी गरजू गरीब लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार नितेश राणे यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.